तेल्हारा: नव्यानेच नियुक्त झालेले ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी कार्यभार सभाळल्यापासून तालुक्यात कारवाईचा सपाटा सुरू असून आज पाथर्डी येथील वरली मटक्यावर धाड टाकून दोन आरोपीना रंगेहाथ अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील ग्राम पाथर्डी येथे वरली मटक्यावर हार जित सुरू असल्याची गुप्त माहिती तेल्हारा पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी सापळा रचून बस स्थानक परिसरात सुरू असलेल्या वरली मटक्यावर धाड टाकली असता आरोपी सुरेश चंद्रभान गवई 38 व अमृता महादेव राऊत 65 व वरलीची खायवाडी करणारा गजानन सरोदे यांच्या विरुद्ध कलम १२ अ जुगार, १०९ भांदवी नुसार गुन्हा दाखल करून अंदाजे चार हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्यासह पीएसआय गणेश कायंदे, पो को अनिल सिरसाट,हरिशंकर शुक्ला, रोशन ठाकूर यांनी केली.











