तेल्हारा :- अकोला जिल्ह्यासह आजूबाजूचे जिल्ह्यातून तेल्हारा बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात बस येतात. याठिकाणी येणाऱ्या बस चालकांना तसेच वाहकांना तेल्हारा बस स्थानकावर रात्री मुक्काम करण्याकरता कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येते. तेल्हारा बस स्थानकावर रात्रीला आलेल्या बस चालक तसेच वाहकानसाठी विश्राम कक्षाची निर्मिती केली आहे परंतु काल रात्री आगार व्यवस्थापक यांनी 18 ते 20 चालक तसेच वाहकाना विश्राम कक्षा मधून बाहेर काढले.
हा प्रकार घडल्यानंतर तेल्हारा बस स्थानक मधील चालत असेच वाहकांनी अख्खी रात्र तेल्हारा बस स्थानकाच्या गेटच्या बाहेर झोपून काढली, यासंदर्भात काही चालक तसेच वाहकांनी तेल्हारा पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरीता केली असता तुमची तक्रार घेता येत नाही असे पोलिसांन तर्फे त्यांना सांगण्यात आले. घडलेला प्रकार हा अत्यंत गंभीर असून एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का असा प्रश्न चालक तसेच वाहकांन मध्ये निर्माण झाला आहे.