• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मिशन कवच कुंडलः दिवाळीपूर्वी अधिकाधिक लोकांच्या लसीकरणाचे नियोजन करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

Our Media by Our Media
October 8, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
81 1
0
Mission Kavach Kundal
16
SHARES
585
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.८: मिशन कवच कुंडल अंतर्गत कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी दिवाळीच्या आत अधिकाधिक लोकांचे लसीकरण व्हावे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा, त्यासाठी उपविभागीय अधिकारी ते गावातील ग्रामसेवक तलाठी, आशा अंगणवाडी सेविका या सर्व यंत्रणेनी समन्वय राखून प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील कोविड लसीकरण सद्यस्थितीबाबत आज आढावा घेण्यात आला. याबैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, डॉ. मनिष शर्मा, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी,तहसिलदार आदी उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

यावेळी संजय खडसे यांनी सांगितले की, जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढविणे हे तिसरी लाट थोपविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मिशन कवच कुंडलच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यातील लसीकरणासाठी पुरेसे डोस उपलब्ध होत आहेत. तालुका पातळीवर लसीकरणाचे नियोजन करुन उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आढावा घ्यावा.

जिल्ह्यत दररोज एका लसीकरण केंद्रावर १५० जणांचे लसीकरण झाल्यास हे अभियान यशस्वी करता येईल. सद्यस्थितीत जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यंत्रणे अंतर्गत अकोला तालुक्यात ३२, अकोट १५, बाळापूर १६, बार्शी टाकळी १७, तेल्हारा १०, मुर्तिजापुर १५, पातूर १२ असे ११७ लसीकरण केंद्र आहेत. तर जिल्हा रुग्णालय अंतर्गत ग्रामिण रुग्णालय अकोट,चार, बाळापूर पाच, बार्शी टाकळी दोन, तेल्हारा दोन, चतारी एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर दोन, उपकेंद्र नंदीपेठ ३, गोलबाजार २, आयएमए हॉल येथे १, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय प्रत्येकी एक असे २४ सत्र तर मनपा आरोग्य यंत्रणेचे १०- असे जिल्ह्यात एकूण १५१ सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आता शिक्षकांनी जी मुले शाळेत येतात यांच्या पालकांनी लसीकरण केल्याबाबत खात्री करावी, १८ वर्षे वयाच्या लोकांना लसीकरण होत असल्याने महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी लसीकरण केल्याबाबत पाठपुरावा करावा, जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील कर्मचारी व त्यांचे पात्र गटातील कुटुंब सदस्य यांचे लसीकरण झाल्याबाबत खातरजमा करावी, याच प्रमाणे दुकाने, एम आय डी सी येथील उद्योग इ. ठिकाणी लसीकरणाबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन संबंधित यंत्रणांना देत आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

Tags: corona vaccinationMission Kavach KundalNima Arora
Previous Post

मानवी आहारातील अंड्यांच्या महत्त्वाबाबत जागृती: जागतिक अंडी दिनानिमित्त स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचा उपक्रम

Next Post

हिवरखेड येथे अग्रसेन जयंती उत्साहात साजरी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अग्रसेन जयंती

हिवरखेड येथे अग्रसेन जयंती उत्साहात साजरी

किड्स पॅराडाईज मध्ये अभिनव प्रवेशोत्सव

पातुरच्या किड्स पॅराडाईज मध्ये अभिनव प्रवेशोत्सव कोरोना योद्धयांना नमन करीत शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.