अकोला: दि.८: जागतिक अंडी दिनानिमित्त अंड्यातील मानवी आहारातील महत्त्व व त्यातील पोषण मूल्य याबाबत जागृती करुन स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेने जागतिक अंडी दिन साजरा केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ.चैतन्य पावसे हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुक्कुट पालन विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. सतिष मनवर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात डॉ. मनवर यांनी जागतिक अंडी दिनाचे महत्त्व विषद केले. तर डॉ. पावसे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे महत्त्व विषद केले. डॉ. मिलिंद दुसाने यांनी मानवी आहारात अंड्यांचे महत्त्व सांगतांना आहाराबाबत असणारे अज्ञान व त्याच्याशी निगडीत कुपोषण व अतिपोषण यासारख्या समस्यांवर प्रकाश टाकला. अंडे हे कोणत्याही प्रकारे भेसळ न होऊ शकणारे सकस आहार असल्याने अंड्यांच्या आहारातील समावेशाला चालना द्यावी,असेही त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन समन्वयक डॉ. मंगेश वडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सह समन्वय डॉ. प्रशांत कपाले यांनी केले. यावेळी डॉ.मिलिंद थोरात, डॉ. सुनील वाघमारे, डॉ. राऊळकर, डॉ. इंगोले, डॉ. किशोर पजई, डॉ. शैलेंद्र कुरळकर, डॉ. प्राजक्ता कुरळकर आणि विद्यार्थी वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते.