• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 30, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

घटस्थापना : घटस्थापनेने नवरात्रौत्सवास आजपासून प्रारंभ

Our Media by Our Media
October 7, 2021
in राज्य, उत्सव
Reading Time: 1 min read
87 1
0
navratroutsav
32
SHARES
628
VIEWS
FBWhatsappTelegram

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी घटस्थापना होणार आहे. यानंतर तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ होईल. याचबरोबर जिल्ह्यातील मंदिरे आणि घरोघरी नवरात्रौत्सवा अंतर्गत घटस्थापना होणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असणारी मंदिरे दर्शनासाठी खुली होणार असल्याने याची जय्यत तयारी जिल्हा प्रशासन, पोलिस दल, महापालिका आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, या संपूर्ण तयारीची पाहणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे, प्रांत वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे-भामरे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

महाद्वारवरील व्यापार्‍यांना सहकार्य ( घटस्थापना )

नवरात्रौत्सवकाळात महाद्वार रोड परिसरातील व्यापारी व रहिवाशांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. यावेळी व्यापारी प्रतिनिधी किरण नकाते, कुलदीप गायकवाड, मनोज बहिरशेठ, पंकज भांबुरे, जयंत गोयानी, दीपक बागल आदी उपस्थित होते.

शहरात 11 ठिकाणी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगकरिता 10 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

प्राचीन भारतीय कृषी संस्कृतीतील महत्त्वाचा सण म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवरात्रौत्सवाची सुरुवात गुरुवारी परंपरेनुसार घटस्थापनेने होत आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी घटस्थापना होणार आहे. यानंतर तोफेच्या सलामीने शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ होईल. याचबरोबर जिल्ह्यातील विविध देव-देवतांच्या मंदिरांत आणि घरोघरी नवरात्रौत्सवाअंतर्गत घटस्थापना होणार आहे. दीड वर्षानंतर मंदिरे दर्शनासाठी खुली होणार असल्याने भाविकांबरोबरच व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

जोतिबा, भवानी, टेंबलाई, कात्यायनी मंदिरे सज्ज ( घटस्थापना )

करवीर निवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा, जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिर, टेंबलाई टेकडीवरील त्र्यंबोली मंदिर यासह नवदुर्गा मंदिरांमध्ये नवरात्रौत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्र उत्सवानिमित्त दि. 7 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत विविध पारंपरिक धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अंबाबाईची पूजा संकल्पना ‘सप्तमातृका’ ( घटस्थापना )

दिनांक तिथी पूजा

7 ऑक्टोबर  प्रतिपदा ब—ह्माणी
8 ऑक्टो.  द्वितीया माहेश्वरी
9 ऑक्टो.  तृतीया युक्त चतुर्थी कौमारी
10 ऑक्टो. पंचमी गजारूढ अंबारी
11 ऑक्टो. षष्ठी वैष्णवी
12 ऑक्टो. सप्तमी इंद्राणी
13 ऑक्टो. अष्टमी महिषासुरमर्दिनी
14 ऑक्टो. नवमी चामुंडा
15 ऑक्टो. दसरा अश्वारूढ रथातील

Tags: GhatsthapanaKolhapurNavratrautsava
Previous Post

अकोलखेड जि.प. मधुन शिवसेनेचे जगन्नाथ निचळ 1283 मतांनी विजयी, तर अकोलखेड पं.स. मधुन शिवसेनेचे ईश्वर चिठ्ठीने सुरज गणभोज विजयी..!

Next Post

Navratri 2021: “कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे”; CM उद्धव ठाकरेंची मुंबादेवीचरणी प्रार्थना, सहकुटुंब घेतले दर्शन

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
Navratri 2021

Navratri 2021: “कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे”; CM उद्धव ठाकरेंची मुंबादेवीचरणी प्रार्थना, सहकुटुंब घेतले दर्शन

नवरात्रोत्सव

नवरात्री अन नऊ रंगाचे महत्व यंदा कुठला रंग कुठल्या दिवशी जाणून घ्या अवर अकोला न्यु ज सोबत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.