नवी दिल्ली : LPG Price : एकीकडे पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरुच असताना सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडर दरात 15 रुपयांची वाढ केली आहे. बुधवारपासूनच वाढलेले दर अंमलात येतील, असे तेल कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.
ताज्या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचे दर 899.50 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे 5 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचे दर 502 रुपयांवर गेले आहेत. गत जुलै महिन्यापासून गॅस सिलेंडर दरात ( LPG Price ) 90 रुपयांची वाढ झालेली आहे. दिल्ली आणि मुंबईत गॅस सिलेंडरचे दर समान म्हणजे 899.50 रुपयांवर गेले असून कोलकाता येथे हे दर 926 रुपयांवर गेले आहेत.
तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा सपाटा सुरुच
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा सपाटा सुरुच असून, ( Petrol, diesel prices hiked ) देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे प्रति लिटरचे दर १०८.९६ रुपयांवर पोहोचले आहेत. दुसरीकडे दिल्लीमध्ये हेच दर १०२.९४ रुपयांवर गेले आहेत. ( Petrol, diesel prices hiked ) इंधन दरवाढीमुळे आगामी काळात महागाईचा मोठा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.