• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

सार्वजनिक नवरात्रौत्सव-2021; गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना

Our Media by Our Media
October 5, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
126 1
0
nima arora collector jilhadhikari akola
19
SHARES
910
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.5: गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव 2021 बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रोत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

दि. 7 ते 15 ऑक्टोबर 2021 दरम्यान नवरात्र, दुर्गापुजा, दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. नवरात्रौत्सव साजरा करताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेवून मार्गदर्शक सूचनाचे पालन करा.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

मार्गदर्शक सूचना :

कोवीड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने “ब्रेक द चेन” अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे. सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका / स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरीता चार फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची दोन फूटांच्या मर्यादेत असावी. मागील वर्षी प्रमाणे शक्यतो देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

नवरात्रौत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रमे / शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी तसेच देवीच्या मंडपांमध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारीक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील,इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्रांची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात यावी.

विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर, मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाजमाध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे सोहळा बघण्याची व्यवस्था करावी.

कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत स्थानिक प्रशासनाकडून अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक आहे.

Tags: neema arora
Previous Post

विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत विविध योजनांकरीता 30 कोटी 23 लक्ष 77 हजार निधी वितरीत

Next Post

जि.प.व पं.स.पोटनिवडणुक: अकोट येथील पर्यायी मार्गात बदल

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
election

जि.प.व पं.स.पोटनिवडणुक: अकोट येथील पर्यायी मार्गात बदल

राहुल गांधींना फेसबुकची नोटीस;

Wayanad Congress: राहुल गांधींना धक्का! काँग्रेसने दिशा गमावलीय सांगत वायनाडमधील बड्या नेत्याचा राजीनामा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.