कुटासा (कुशल भगत): सभेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक नवदुर्गा उत्सव धम्मचक्र परिवर्तन दिन ईद-ए-मिलाद निमित्ताने शांतता समितीची महत्वाची बैठक घेण्यात आली. बैठकीसाठी अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी सौ. रितू खोकर यांनी कुटासा येथील सभेच्या स्थळी आपली उपस्थिती दिली प्रसंगी उपस्थित नागरिकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे गावात प्रथम आगमन प्रसंगी स्वागत केले. सभेचे संचालन संजय गावंडे प्रतिनिधी यांनी केले ह्यामध्ये गावात शांतता व सुव्यवस्था राहील असे सांगून गावाविषयी थोडक्यात माहिती विशद केली. प्रसंगी विजयसिंग सोळके यांनीसुद्धा आपले विचार मांडले. ठाणेदार राऊत यांनी दुर्गा उत्सव मंडळ यांना महत्त्वाच्या सूचना देऊन सर्वांनी परवानगी काढणे आवश्यक आहे असे सांगून मिरवणूक फटाके व वाद्य डीजे ह्याला पूर्णता बंदी आहे, असे सांगितले.
अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी उपस्थित राजकीय पक्षांच्या लोकांना तसेच नव दुर्गा मंडळांच्या अध्यक्ष व सदस्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले व कायदा व सुव्यवस्था राखल्या गेली पाहिजे. असे सांगून कायदा विरुद्ध गेल्यास कोणाची गय होणार नाही असे सांगितले कोरोना संसर्गाचे आजारामुळे शासनाच्या निर्देशानुसार उत्सव साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्वांनीच शासनाचे घडले यांचे पालन करावे सामाजिक जबाबदारी ओळखून नवरात्र उत्सव धम्मचक्र परिवर्तन दिन ईद-ए-मिलाद तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान शांतता राखून उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे सांगितले दरम्यान सोशल डिस्टंसिंग मास्क सेनेटायझर चा वापर गर्दी होणार नाही.
याची दक्षता घ्यावी तसेच मंडळांनी जागेवरच नवरात्र उत्सव साजरा करुन दिवसाच्या आत विसर्जन करावे असे सांगितले. तसेच ह्या काळात समाजकंटकांच्या वाफेला बळी पडू नये परिसरात जिल्हा परिषद निवडणुका असून अफवांना बळी पडू नये तसेच आम्ही त्यांना सुद्धा बळी पडू नये दबावतंत्र चा वापर होऊ नये यासाठी पोलीस विभागामार्फत कडेकोट बंदोबस्त सर्व कार्यक्रमादरम्यान देण्यात येईल असे सांगितले. दरम्यान याप्रसंगी कुशल भगत निरंजन गावंडे रहमान पठाण विलास थोटे हुसेन खाँपठाण मंगेश देशमुख आयेश हेड कॉन्स्टेबल अरुण तेलगोटे दिंडो कार सह गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते शेवटी उपस्थितांचे आभार मानून सभा संपन्न.