अकोला: दि.4 : जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. या क्षेत्रातील निवडणूक अधिकारी यांचेकडून निवडणुक विषयक विविध जबाबदारी पार पाडण्याकरीता क्षेत्रीय अधिकारी व सहायक क्षेत्रीय अधिकारी यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (129) (133) (143) (144) अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक कालावधीकरीता कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकार प्रदान करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.
या अधिकारानुसार त्यांनी त्यांचे क्षेत्रात आवश्यकतेनुसार वापर करुन निवडणूक सुरळीत पार पाडावी.