‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे दिग्गज अभिनेते नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक यांचे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. घनश्याम नायक मागील काही महिन्यांपासून कॅन्सरने पीडित होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे दोन ऑपरेशन्स झाले होते.
तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत त्यांची नट्टू काका ही व्यक्तीरेखा होती. वय झाल्याने ते रोज शूटिंगवर जाऊ शकत नव्हते. पण, ते शेवटपर्यंत तारक मेहताच्या टीमचा एक भाग होते.
असित मोदीने दिली माहिती
घनश्याम नायक यांचा जन्म १२ मे, १९४४ रोजी झाला होता. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. घनश्याम यांच्या निधनाने तारक मेहताची टीम दु:खात आहे. या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदीने घनश्याम यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिलंय- आमचे प्रेमळ नट्टू काका आता आमच्यासोबत नाही राहिले.
परम कृपाळू परमेश्वर त्यांना आपल्या चरणी स्थान देवो आणि परम शांती देवो. त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. #नटुकाका. आम्ही तुम्हाला नाही विसरू शकत.
कॅन्सरग्रस्त होते घनश्याम नायक
घनश्याम नायक वयाच्या ७७ वर्षीही काम करायचे.
ते आपल्या फॅन्सचे भरपूर मनोरंजन करायचे.
जून महिन्यात त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते.
अनेक चित्रपटात अभिनय
घनश्याम नायक यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे.
यामध्ये ‘बेटा’, ‘लाडला’, ‘क्रांतिवीर’, ‘बरसात’, ‘घातक’, ‘चायना गेट’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लज्जा’, ‘तेरे नाम’, ‘खाकी’ आणि ‘चोरी चोरी’ आदी चित्रपटांचा समावेश आहे.