अकोला, दि.2: जिल्ह्यात ज्या जिल्हा परिषद निवडणुक विभाग व पंचायत समिती गणात पोटनिवडणुक होत आहेत. तेथे निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मतदानाच्या एक दिवस आधी (दि.४), मतदानाच्या दिवशी (दि.५) व मतमोजणीच्या दिवशी (दि.६) रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.
या आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.