अकोला :- शहरातील अकोला मेडिलकचे संचालक अजय श्रॉफ यांना अज्ञात तीन आरोपीने मारहाण करून त्यांच्या अंगावर असलेले 3 लाख ८० हजार रुपयांचे दागिणे लुटल्याची घटना पत्रकार कॉलनी परिसरात घडली. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
अकोला मेडिकलचे संचालक अजय श्रॉफ हे पत्रकार कॉलनी परिसरातील मंदिरात दररोजच्या प्रमाणे रात्रीच्या सुमारास दर्शनासाठी गेले होते. मंदिर परिसरात असलेल्या अंधाराचा फायदा घेवून अंदाजे 17 ते 18 वर्षे वयोगटातील तीन युवकांनी मागून येवून त्यांना पकडले व मंदिराच्या मागच्या बाजूला घेवून गेले. त्यांच्या जवळ असलेले 16 हजार रुपये रोख व अंगावरील सोन्याची अंगठी, कडे आदीसह तीन लाख 82 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लुटला. या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करत आहेत.










