मुंबई : येत्या 4 ऑक्टोबरपासून (4th October) राज्यात शाळा (School) सुरु होणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी केली आहे. मात्र मुंबईतील शाळा (School openings date in mumbai) कधी सुरू होणार आणि कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु होणार याबद्दलची माहिती मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल (iqbal singh chahal) यांनी दिली. येत्या 4 ऑक्टोबरपासून मुंबईतील (Schools Reopening Maharashtra) शाळाही सुरु करण्यात येणार आहे. राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करुन मुंबईतील शाळा सुरु करण्यात येतील, अशी माहिती मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली आहे. तसंच आठवी ते बारावीचे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरु होतील. अमित शहा यांच्या भेटीनंतर आता कॅप्टन अमरिंदर सिंह कोणाला भेटले? राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीनुसार एकदिवसाआड शाळा भरणार आहेत.
तसंच एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याला बसायला परवानगी असेल. विद्यार्थ्याला शाळेत यायला पालकांची परवानगी असणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, कोरोना व्हायरसचं संकट अजूनही संपलेलं नाही.
त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. काळजी घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार मुंबईतल्या शाळा येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरु होतील. विद्यार्थ्यांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन करणं गरजेचं असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
उद्यापासून ‘या’ राज्यात दारुची दुकानं बंद…बंद…बंद काय आहे नियमावली एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल. शाळा प्रवेशासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल. सर्व विद्यार्थी शाळेत येणार असतील तर एक दिवस आड शाळा भरेल. शाळेत एका दिवशी 15 ते 20 विद्यार्थ्यांनाच प्रवेश असेल.
शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक असेल. मास्क घालणं अनिवार्य असेल. शाळेत सॅनिटायजरचा वापर करणंही गरजेचं आहे. काय आहेत सूचना शाळा सुरु करण्यापूर्वी आणि शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजना राबनवण्यात याव्यात.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने सोडीयम हायपोक््लोराईड सोल्युशनने निर्जतुंकीकरण करुन घेण्यात यावे तसेच, इतर व्यवस्थापनांच्या शाळांनी आपल्या स्तरावर वर्गांचे निर्जतुंकीकरण करुन घ्यावे. राज्य शासनाकडून जारी करण्यात आलेल्या कोरोनासंबंधी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं. IND W vs AUS W: ऐतिहासिक टेस्टमध्ये स्मृतीचा धमाका, भारताची दमदार सुरूवात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेष लसीकरण ड्राईव्ह आता संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती कमी झाली आहे. गावावरून आलेले लोक कोरोना टेस्ट करण्यासाठी कमी येत आहेत.
मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट 0.06 टक्के इतका आहे. मुंबईतील 15 टक्के बेड्स रुग्णांनी भरलेले आहेत. मुंबईतील जवळपास 70 टक्के शिक्षकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. शिक्षकांच्या लसीकरणावर भर देत आहोत. पालिकेच्या 10 हजार शिक्षकांपैकी 7 हजार शिक्षकांच लसीकरण झालं आहे. या सर्वांचा आढावा घेण्यात येणार आहे. शिक्षकच नाही तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी विशेष ड्राईव्ह घेतला जाईल जेणेकरुन सर्व शिक्षक लसवंत होतील असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.