पातूर (सुनिल गाडगे) : दि. २९/९/२०२१ रोजी बेलुरा खुर्द, ता. पातूर, जि.अकोला येथे वर्ग क्र:- ४ ची सोयाबीन-तूर पिकाची शेतीशाळा प्रगतशील शेतकरी श्री पुंडलिक डांगे यांच्या शेतात घेण्यात आली.
शेतीशाळा प्रशिक्षक :- जयंत सुरवाडे यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे, रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी पिकाचे सर्वेक्षण करून किडीचे व रोगाचे नियोजन करणे, मित्रकीड व शत्रूकीड ओळख व व्यवस्थापन, वनस्पतीजन्य कीटकनाशक जसे दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत, फवारणी करतांना सेफ्टी किट चा वापर व काळजी घेणे याबद्दल मार्गदर्शन केले.
तसेच शेतीशाळा समन्व्यक मा. श्री. दिलीप बोबडे यांनी तुरीच्या पिकाची शेंडे खुडणं, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न, उत्पादनखर्च व उत्पन्न यातील फरक, सोयाबीन पिकाची निवडक झाडाची निवड करून तिची वेगळी बांधणी करणे पुढील पेरणीला बियाणे तयार करणे बद्दल मार्गदर्शन केले. श्री. रवीशंकर जैविक मिशन चे जिल्हा समन्व्यक मा. श्री. जी. टी. कराळे साहेब यांनी सेंद्रिय शेती व जैविक शेती विषमुक्त, शेती करणे याबद्दल मार्गदर्शन केले. शेतीशाळेला कृषी सहाय्यक विनोद देवकर साहेब, सरपंच धमशील इंगळे, उपसरपंच श्री. साबे कृषी मित्र सुरज देशमुख, सुभाष डांगे, दीपक डाबेराव, गजानन देशमुख, गणेश तायडे, ज्ञानेश्वर शेळके, मनोहर सरप, निलेश पोतखेडे, संकेत देशमुख, सागर साबे आणि गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.