• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

यु.पी.एस.सीः ‘कठीण’ आहे पण ‘अशक्य’ नाही; जिल्ह्यातील यशस्वी उमेदवार आश्विन राठोड यांच्यासोबत संवाद

Our Media by Our Media
September 29, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
142 2
0
यु.पी.एस.सीः ‘कठीण’ आहे पण ‘अशक्य’ नाही; जिल्ह्यातील यशस्वी उमेदवार आश्विन राठोड यांच्यासोबत संवाद
22
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

(अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेले आश्विन  राठोड यांनी नुकतेच यु.पी.एस.सी परीक्षेत यश संपादन केले. या परीक्षेबाबत तसेच या यशापर्यंत त्यांना नेणारा परीश्रमांचा प्रवास जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी केलेली बातचीत.)

 

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रश्न : आपण आय.ए.एस. व्हावे असा विचार मनात कधी विचार आला व त्याकरीता  सुरुवातीपासुन काय नियोजन केले?

उत्तर : शालेय शिक्षण घेत असतांना मी आय.पी.एस. होण्याचे स्वप्न बाळगून होतो. पुढे बी.एस.सी करत असतांना  व युपीएससी परीक्षेची  पूर्व तयारी करताना आय.ए.एस. होण्याचे मनापासून  ठरविले. बी.एस.सी. अभ्यासासोबतच यु.पी.एस.सी परीक्षेची   पुर्वतयारी सुरु केली. यासाठी बेसीक अभ्यास, भरपूर वाचन व सरावावर भर दिला.

प्रश्न : यु.पी.एस.सी. परीक्षेकरीता कशाप्रकारे पूर्व तयारी केली?

उत्तर : यु.पी.एस.सी.करीता स्वत:मध्ये विश्वास असणे आवश्यक आहे. विषयाच्या अवास्तव वाचनापेक्षा मुलभूत अभ्यासक्रम व माध्यमावर भर देवून जास्तीत जास्त सराव केला.

प्रश्न : आपण कोणत्या शाखेतून शैक्षणिक अर्हता पूर्ण केली. या अभ्यासक्रमाचा यु.पी.एस.सी. परीक्षेकरीता

        किती व कसा फायदा झाला?

उत्तर : शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विज्ञान शाखेत वनस्पतीशास्त्र (बॉटनी) व प्राणीशास्त्र(झूलॉजी) विषय घेतले.त्याच विद्याशाखेत बीएससी ही पदवी पूर्ण केली. त्याचा फायदा मला प्रत्यक्ष परीक्षेची तयार करतांना झाला.

प्रश्न : यु.पी.एस.सी. मुख्य परीक्षेसाठी कोणकोणते विषय घेतले व ते घेण्यामागचा उद्देश काय होता?

उत्तर : यु.पी.एस.सी. परीक्षेसाठी मुख्य विषय वनस्पतीशास्त्र व पर्यायी विषय प्राणीशास्त्र हा होता. हेच माझ्या पदवीचे विषय असल्याने ते आवडीचे विषयही होते. त्याचा अभ्यास करणे माझ्यासाठी सोईचे होते, म्हणून या विषयांची निवड केली.

प्रश्न :युपीएससी परीक्षेकरीता कोणाचे मार्गदर्शन घेतले? परीक्षेची तयारी कुठे व कशी केली?

उत्तर : यु.पी.एस.सी.  परीक्षेची तयारी मी दिल्ली येथे  केली. या परीक्षेकरीता माझे शिक्षक, युपीएससी परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक तसेच माझे सिनीयर, तसेच माझे मित्रमंडळी व आई-वडीलांचा खूप मोठा वाटा आहे. या परीक्षेसाठी मी जास्तीत जास्त भर सरावावर दिला.

प्रश्न :तुम्ही अकोला जिल्ह्याचे आहात; आपल्या जिल्ह्यात युपीएससी परीक्षा देण्यासाठी कितपत पोषक

         वातावरण आहे?

उत्तर : माझे शालेय शिक्षण अकोला जिल्ह्यात झाले. जिल्ह्यात यु.पी.एस.सी. पूर्वतयारी करीता आवश्यक पोषक

          वातावरण नाही. परंतु कठीण परिश्रम व प्रयत्नाने यु.पी.एस.सी. पूर्वपरीक्षा देवू शकता. या परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी शासनही  अनेक उपक्रम राबवित आहे. तसेच ऑनलाईन, युट्युब सारख्या माध्यमाव्दारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन परीक्षार्थी आपला अभ्यास करु शकता.

प्रश्न : यु.पी.एस.सी. परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?

उत्तर : यु.पी.एस.सी. परीक्षा ही कठीण परीक्षा आहे परंतु अशक्य नाही. परीक्षेची पूर्वतयारी करताना कठीण परिश्रमांसोबत ‘स्मार्ट वर्क’ आवश्यक आहे. यु.पी.एस.सी. ची तयारी करताना आत्मविश्वास, सातत्य, सराव अभ्यासक्रमावर भर द्यायला हवा. तसेच आपल्याकडे अभ्यासाचे जे मुळ स्त्रोत( शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके, एनसीईआरटीची पुस्तके इ.) आहेत, त्यांचाही वापर अधिकाधिक करायला हवा. सराव जास्तीत जास्त करा, कमी पण चांगले मित्र बनवा व ज्या व्यक्तीसोबत आहात तो तुम्हाला सकारात्मक विचाराचा व प्रोत्साहित करणार असावा. सर्वात महत्वाचे परीक्षेची तयारी करताना स्वत:वर विश्वास ठेवून यु.पी.एस.सी. हेच आपले  ध्येय असावे.

-शब्दांकनः सतिश बगमारे, माहिती सहायक, जिमाका, अकोला

Tags: AkolaAshwin RathoreUPSC
Previous Post

अतिवृष्टीचा इशारा

Next Post

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा संपन्न

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा संपन्न

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा संपन्न

अकोला पोलिसांनी तडीपार आरोपींसह अवैध धंद्यांविरोधात केली धडक कारवाई

दहीहांडा पोलीसांनी अवैध देशी दारुची वाहतुक करणाऱ्याला रंगेहाथ पकडले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.