• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

हरवले ते गवसलेः ‘आधार’ नोंदणीमुळे मिळाले बालिकेस कुटुंब

Our Media by Our Media
September 27, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
167 2
0
Aadhar Card
27
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.२७: महिला व बालविकास विभागाने बालकांच्या आधार नोंदणीचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाची फलश्रृती झाली ती ‘आधार’ नोंदणी दरम्यान एका कुटुंबापासून दुरावलेल्या बालिकेला पुन्हा तिचे कुटुंब मिळण्यात.

सन २०१९ मध्ये येथील गायत्री बालिकाश्रमात एक बालिकेस दहिहांडा पोलीस स्टेशनमार्फत दाखल करण्यात आले. ही बालिका तिचे राहण्याचे ठिकाण हे बिहार, पटना, दिल्ली असे काहीतरी सांगत होती. तिला घरच्यांचे नाव व अन्य माहितीही सांगता येत नव्हती. तिचे नाव ती ‘परी’ असे सांगत होती. बालिकाश्रमात दाखल झाल्यानंतर या बालिकेच्या पालकांचा तपास करण्यास सर्व तपास यंत्रणा काम करीत होत्या.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दरम्यान, बालगृहातील बालकांचे बॅंक खाते उघडणे व त्यासाठी आधारकार्ड नोंदणी करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी महिला व बालविकास विभागाला दिले होते. त्यानुसार, महिला व बालविकास विभागाच्या सर्व बालगृहातील बालकांच्या आधारकार्ड नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आला. दि.४ सप्टेंबर रोजी गायत्री बालिकाश्रमातील बालकांचे आधार कार्ड साठी नोंदणी करण्यात आली. त्यावेळी संपर्कासाठी अधीक्षक वैशाली भटकर यांचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली.

दहा दिवसांनंतर ‘परी’ चे आधार कार्ड नोंदणी रद्द झाली असल्याचा मेसेज श्रीमती भटकर यांना आला. त्याचे कारण ह्या बालिकेचे आधारकार्ड यापूर्वीच म्हणजे सन २०१५ मध्येच काढण्यात आले होते. तथापि, आधार च्या कस्टमर केअर सेंटरने तिची संपूर्ण माहिती गोपनीयतेच्या कारणास्तव देण्यास असमर्थता दर्शविली. त्यानुसार महिला व बालविकास विभागाचे सुनिल लाडुलकर यांनी आधार कार्डचे जिल्हा समन्वयक सौरभ जैन यांना संपर्क केला. त्यांनी शाळा क्रमांक १४ येथील आधार केंद्रावर जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे या बालिकेस तेथे नेऊन तिचे अंगठ्याचे ठसे घेऊन तिचे मुळ आधारकार्ड डाऊनलोड करण्यात आले. त्यावर तिचा पत्ता व अन्य माहिती मिळाली. विशेष म्हणजे हा पत्ता अकोल्याचाच होता. आणि तिचे नाव ‘लक्ष्मी’ होते. आधार कार्डावर दिलेल्या पत्त्यावर जाऊन महिला व बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपर्क केला. तेव्हा हे कुटुंब येथून नागपूर येथे स्थलांतरीत झाल्याचे समजले. तेथून काही लोकांकडून बालिकेच्या वडीलांचा नंबर मिळवला. त्यावर संपर्क केला असता, सर्व उलगडा झाला.

या मुलीच्या पालकांची आणि तिची ओळख पटवण्याचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर शनिवार दि.२५ रोजी या बालिकेस घेण्यासाठी तिचे पालक नागपूरहून अकोल्यात आले. ‘लक्ष्मी’ ला महिला व बालविकास विभागाने तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, सुनिल लाडूलकर, अधीक्षक वैशाली भटकर व अन्य कर्मचाऱ्यांनी ह्या तपासाची चक्रे गतिमान ठेवल्याने कुटुंबापासून दुरावलेल्या बालिकेला तिचे कुटुंब पुन्हा मिळाले.

Previous Post

भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटक कामगार संघटनेचा निदर्शने व्दारे भारत बंद मधे सहभाग.!

Next Post

मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
cm-uddhav-thakrey-maharashtra-cm

मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

यु.पी.एस.सी. उर्त्तीण आश्विन राठोड यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार; अपयशाला न घाबरता आत्मविश्वासाने सामोरे जा- आश्विन राठोड

यु.पी.एस.सी. उर्त्तीण आश्विन राठोड यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार; अपयशाला न घाबरता आत्मविश्वासाने सामोरे जा- आश्विन राठोड

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.