तेल्हारा: तेल्हारा येथील प्रभाग 6 मध्ये कोविड लसीकरण उस्फूर्त प्रतिसाद नागरिकांन कडून मिळाला यात प्रभागाचे नगरसेविका सौ. नलिनी ताई तायडे व नगरसेवक सुनिल राठोड यांनी आयोजित केलेल्या प्रभाग क्रमांक 6 मधील covid लसीकरण शिबीर व बँक विमा शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 260 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
त्याच सोबत बँक विमा शिबिराला सुद्धा नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. जवळपास 99 नागरिकांनी स्वतःचा विमा काढला. यावेळी भाजप व शेतकरी पॅनल चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
हे शिबीर यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी किसनराव आमले सचिन तायडे, नीलेश खेट्टे, नीलेश जवकार भाजयूमो चे शहर अध्यक्ष गणेश इंगोले, रवि बालगुडे, गणेश माठे, वैभव सोनोने, अनिकेत बकाल, सागर नेरकर, महेश धनभर, प्रतीक वानखडे गीत पिंपळकर, ओम वासनकर सम्राट पानझाडे, यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. अशोक तापडिया, डॉ. सदाफळे, डॉ. इंगळे, डेरे मॅडम, गोमासे मॅडम, तुषार भुजबले रोशन चांडक यांचा सत्कार करण्यात आला.