अकोला,दि.23 – जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या बाधितांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतुन 54 कोटी 72 लक्ष 17 हजार रुपये जिल्ह्यातील सातही तहसिलदार यांच्यामार्फत वितरीत करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
अतिवृष्टी व पुरामुळे पुर्णत:/अशंत: नुकसान झालेली घरे, झोपडी, मृत जनावरे, गोठे, हस्तकला व कारागिर नुकसान, खरडुन गेलेली शेती, कुकुट्टपालन शेडचे नुकसान व इतर झालेल्या नुकसानीकरीता जिल्ह्यातील तालुक्यांना निधी वितरीत करण्यात आले. त्यात अकोला तालुक्याकरीता 43 कोटी 1 लक्ष 77 हजार, बार्शिटाकळी तालुक्याकरीता 1 कोटी 80 लक्ष 99 हजार, अकोट तालुक्याकरीता 1 कोटी 74 लक्ष 20 हजार, तेल्हारा तालुक्याकरीता 49 कोटी 81 लक्ष, बाळापूर तालुक्याकरीता 7 कोटी 62 लक्ष 5 हजार, पातुर तालुक्याकरीता 15 हजार तर मुर्तिजापूर तालुक्याकरीता 3 लक्ष 20 हजार असे एकूण 54 कोटी 72 लक्ष 17 हजार रुपये निधी वितरीत करण्यात आले असून हा निधी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसिलदार यांच्या मार्फत नुकसानग्रस्त बाधीताना वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाव्दारे कळविण्यात आली आहे.