अकोला,दि.23 – केंद्रशासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल विभागाच्या वाळु व रेती उत्खनन मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यातील रेतीघाटांचे सर्वेक्षण करुन नागरिकांच्या माहिती व अभिप्राय नोंदविण्याकरीता या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याबाबत आक्षेप असल्यास 30 दिवसांच्या कालावधीत लेखी स्वरुपात नोंदविण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
अकोला जिल्ह्यातील रेतीघाटांचे सर्वेक्षण करुन एकूण 30 रेतीघाट तालुकास्तरीय सनियंत्रण समितीने योग्य असल्याचे कळविले आहे. योग्य असलेल्या वाळु व रेतीघाटांचे तपशिलाचा समावेश करुन जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या माहिती व अभिप्रायकरीता संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याबाबत अभिप्राय, आक्षेप, तक्रार असल्यास त्या लेखी स्वरुपात जिल्हा वाळु संनियंत्रण समिती, खनिकर्म शाखा जिल्हाधिकारी कार्यालय येथे किंवा या ईमेलवर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.