कुटासा (कुशल भगत): गणपती बाप्पा गेल्या दहा दिवसांपासून विराजमान होते. रविवारला मोठ्या प्रमाणात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले बाप्पाचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे जेणेकरून पर्यावरणाचे संरक्षण करता येईल.
या दृष्टीने विसर्जनासाठी कुटासा गावातील पोलीस पाटील गजानन उगले यांनी आपल्या घरीच कृत्रिम तलाव तयार करुन बाप्पाचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. नदीपात्रात विसर्जन करण्यासाठी मनाई करण्यात आली होती. तसेच नदी जवळ पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला होता. सध्या पाऊस खूप असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नदीला पाणी आहे. त्यामुळे नदी पात्रात कोणी जाऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यादृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. कुटासा येथील पोलिस पाटील गजानन उगले यांनी घरीच बाप्पाचे विसर्जन केले.