तेल्हारा: तालुक्यातील थार येथील रहिवासी असलेल्या 27 वर्षीय विवाहितेवर तुझ्या पतीचा अपघात झाला, माझ्यासोबत लवकर चला अशी बतावणी करून स्वतःचे वाहनात तिला पातुर रस्त्याने नेऊन, चाकूचा धाक दाखवून तिची अब्रू लुटून तिच्यावर अत्याचार करून धमकी देऊन शूटिंग करून काढलेल्या फोटोच्या आधारे बदनामीची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याच्या पीडितेच्या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी दिनांक 20 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजे पूर्वी गुन्हा दाखल केला आहे आहे.
महावितरण मध्ये अकोला येथे वायरमन म्हणून काम करणाऱ्या पतीसोबत अकोला येथे गजानन नगर गल्ली नंबर 7 डाबकी रोड येथे विवाहानंतर भाड्याच्या घरात राहायला गेलेल्या 27 वर्षीय विवाहितेशी भाड्याचे वाहनात सामान आणतेवेळी आरोपी वाहनधारक राजकिरण हरिदास कांबळे (वय 35) विद्युत कॉलनी पारस, तालुका बाळापूर इसमासी ओळख झाली होती. सदर आरोपीने या ओळखीचा गैरफायदा घेऊन एके दिवशी सदर विवाहितेच्या घरी जाऊन पतीचा अपघात झाल्याचे सांगून लवकर चला असे सांगितले.
दुर्घटनेच्या वार्तेने भयभीत झालेला विवाहितेने मुलास नंनद कडे ठेवून सदर इसमावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत वाहनात गेली. पातुर रस्त्याने चाकूचा धाक दाखवून त्याने वाहनतच तिच्यावर अत्याचार केला, अब्रू लुटली, जीवाने मारण्याची धमकी दिली, अश्लील फोटो काढले, शूटिंग केली, बदनामीची धमकी दिली, भितीपोटी ही बाब तिने पतीस न सांगितल्याने आरोपीने सदर विवाहितेवर पारस येथे त्याचे घरी व ठीक ठिकाणी दिनांक दोन मार्च 2020 ते 20 सप्टेंबर 2021 या कालावधीत अत्याचार केला. सदर पीडिता तेल्हारा तालुक्यातील थार येथील मूळ रहिवासी असल्याने 20 सप्टेंबर रोजी तेलारा पोलीसात तक्रार नोंदविण्यात आली. तेलारा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी राजकिरण हरिदास कांबळे राहणार विद्युत कॉलनी पारस, तालुका बाळापूर याचे विरुद्ध भांदवीच्या 376 (२) (एन), 506 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गणेश कायंदे पुढील तपास करीत आहेत.