• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पीसीपीएनडीटीः जिल्हास्तरीय दक्षता समिती बैठक जिल्ह्यात ऑगस्ट अखेर हजार मुलांमागे ९७२ मुलींचा जन्म

Our Media by Our Media
September 21, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
92 1
0
पीसीपीएनडीटीः जिल्हास्तरीय दक्षता समिती बैठक जिल्ह्यात ऑगस्ट अखेर हजार मुलांमागे ९७२ मुलींचा जन्म
18
SHARES
665
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. जिल्ह्यात ऑगस्ट २०२१ अखेर एक हजार मुलांमागे ९७२ मुली असे हे प्रमाण आहे. सन २०१६-१७ मध्ये हे प्रमाण एक हजार मुलांमागे ९०५ मुली इतके होते. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा अर्थात पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत आज ही माहिती देण्यात आली.

समितीच्या जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक आज लोकशाही सभागृहात पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार वसो, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन वि.द. सुलोचने, डॉ. सुनिल मानकर, डॉ. स्वप्निल माहोरे, डॉ. मीनल पवार, डॉ. अस्मिता पाठक, डॉ. मीना शिवाल, डॉ. व्ही.टी.सोनोने, डॉ. श्वेता वानखडे, डॉ. सैय्यद इशरत तसेच समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी समितीस माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात ग्रामीण भागात शासकीय पाच तर खाजगी २२ असे २७ सोनोग्राफी चाचणी केंद्र आहेत. तर महापालिका हद्दीत चार शासकीय व १०६ खाजगी असे एकूण ११० सोनोग्राफी चाचणी केंद्र आहेत. जिल्ह्यात कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्यामुळे दर एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. सन २०१६-१७ मध्ये ९०५, २०१७-१८ मध्ये ९११, २०१८-१९ मध्ये ९२४, २०१९-२० मध्ये ९५६, २०२०-२१ मध्ये ९४९ तर सन २०२१-२२ मध्ये (ऑगस्ट २१ अखेर) ९७२ इतके हे प्रमाण आहे. या कायद्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत असते. या समितीमार्फत जिल्ह्यात सन २०१७ पासून दहा स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. गर्भलिंग निदानाचे प्रकार उघडकीस आणण्यासाठी शासनाने खबरी बक्षीस योजना राबवलेली आहे. अशा प्रकारांबाबत माहिती दिल्यास एक लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस खबर देणाऱ्यास दिले जाते. गर्भलिंग निदानाच्या अपप्रवृत्तींबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास ती आपण १८००२३३४४७५ या हेल्पलाईन क्रमांकावर अथवा www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवू शकता, असेही यावेळी सांगण्यात आले.

मुलींच्या जन्माचे स्वागत करतांनाच समाजात होत असलेले गर्भावस्थेतील गर्भस्थ बालकाच्या लिंग निदानाचे प्रकार निंदनीय आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी समाजात जनजागृतीसाठी प्रयत्न करावे. त्यासाठी विविध सामाजिक संस्थांना सहभागी करुन घ्यावे. खबरी योजनेचा अधिकाधिक प्रसार करुन असे गैरप्रकार थांबविण्यासाठी नागरिकांचाही सहभाग घ्यावा. तसेच मिळालेल्या खबरींच्या आधारे समिती मार्फत सोनोग्राफी सेंटर्सची अचानक तपासणीही करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले. बैठकीचे संचलन ॲड. शुभांगी ठाकरे यांनी केले.

Previous Post

नितीन गडकरी: ‘चीनी कंपन्यांची महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक नाही’

Next Post

रासेयोचा राष्ट्रीय पुरस्कारः सपना सुरेश बाबर उत्कृष्ट स्वयंसेविका

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Sapna Babar Satkar

रासेयोचा राष्ट्रीय पुरस्कारः सपना सुरेश बाबर उत्कृष्ट स्वयंसेविका

‘जिल्हा उद्योग मित्र समिती’ च्या बैठकीत विविध विषयांचा आढावा

‘जिल्हा उद्योग मित्र समिती’ च्या बैठकीत विविध विषयांचा आढावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.