बीड : राज्याचे मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने राज्यातील तीन हजार पत्रकारांना कोरोना काळात त्यांचे सुरक्षिततेसाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या सहकार्याने मेडीकल किटचे वितरण केल्याचे व सामाजिक जबाबदारी सांभाळणाऱ्या पत्रकारांना मदत करण्याचे काम केल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमूख मंगेश चिवटे यांनी दिली आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम उपक्रम विभागाचे मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन विविध सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असते. राज्यात कोरोना काळात पत्रकारांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचे आरोग्य चांगले राहावे व त्यांना समाजासाठी काम करता यावे यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यातील पत्रकारांशी संपर्क करत स्वतंत्र मेडीकल किट तयार करून या किटमध्ये पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी पडणाऱ्या औषधांचा समावेश करत राज्यातील तीन हजार पत्रकार बांधवांना या मेडीकल किटचे वितरण करण्यात आले असून आणखीही या किटचे वितरण सुरू असून जास्तीतजास्त पत्रकारांना हे मेडीकल किट देण्याचे काम मंत्री एकनाथ शिंदे यांचे वैद्यकीय कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन करत असल्याचे या वैद्यकीय कक्षाचे प्रमूख मंगेश चिवटे यांनी सांगितले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन उपस्थित होते.
वैद्यकीय कक्षाचे प्रमूख मंगेश चिवटे यांच्या या कार्याबद्दल वडवणी तालूक्यात देवडी येथे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आई लिलावतीबाई देशमूख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांना या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या
*****
म. संपादक,
कृपया वरील वृत्त छायाचित्रासह प्रसिद्ध करावे ही विनंती.
1) वडवणी तालूक्यात देवडी येथे मराठी पञकार परीषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमूख यांचे मातोश्री लिलावतिबाई देशमूख यांना पञकाराना दिलेले आरोग्य किट देताना शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमूख मंगेश चिवटे.
2) शिवसेना वैद्यकीय मदत कृक्षाचे प्रमूख मंगेश चिवटे षेयांचा सत्कार करताना मराठी पञकार परीषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमूख यांचे मातोश्री लिलावतीबाई देशमूख सत्कार करून कार्याचे कौतूक करताना.