कुटासा (कुशल भगत ): शेतकऱ्यांची कपाशी व खरीप हंगामाची तयारी जोरात सुरु झाली असून शेती मशागतीचे कामे वेगाने सुरू आहे. परिसरात संततधार पावसाने हजेरी लावल्याने काही दिवस शेती काम ठप्प पडले होते. आता पाऊस उघडताच परत शेती कामाला वेग आला आहे.
मात्र अशातच कुटासा ते पांतोडा या शेती रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शेतकऱ्यांसमोर संकट कायम असल्याचे चित्र आहे. शेतरस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहे. कुटासा येथील शेतकऱ्यांना खते बी-बियाणे नेण्यासाठी शेत रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने दोन कि मी पर्यंत ५० किलो वजनाचे खताचे बॅग घेऊन जावे लागते.
मशागत करून शेतात घेतलेला माल रस्त्याअभावी शेतातच राहतो गत काही वर्षापासून कुटासा परिसरातील शेत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक गावात शेतरस्तेही नसल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी त्रास सहन करावा लागतो. शेतरस्ते नसल्याने शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. पेरणीसाठी बियाणे खाते शेतात नेण्यासाठी रस्ताच नसल्याचे चित्र आहे.
अनेक शेतकरी 50 किलो खताची बॅग डोक्यावर वाहून नेतात पेरणीनंतरही शेतकऱ्या समोरची संकटे संपत नसल्याचे चित्र आहे. पिक तयार झाल्यानंतर रस्त्याअभावी शेतातच पडून राहते. दरवर्षी प्रशासनाकडे शेत रस्ते तयार करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे अधिकारी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. कुटासा ते पांतोडा या शेतरस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी येथील शेतकरी वर्गाकडुन केली जात आहे.