तेल्हारा: तेल्हारा तालुक्यातील सर्वात जुनेजाणते प्रहार सेवक राजेश खारोडे यांची अकोला जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या महासचिवपदाची मोठी जबाबदारी मा. बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने व बल्लूभाऊ जंजाळळ यांच्या मार्गदर्शनात विश्रामगृह अकोला येथे त्यांना नियुक्तीचे पत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बबलू जंजाळ, पुरुषोत्तम पाटील आवारे, सुधाकर खूंमकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या तेल्हारा शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य ते अकोला जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या महासचिव पदाची जबाबदारी म्हणजेच त्यांच्या एकनिष्ठतेवर, कार्यावर विश्वासच म्हणावा लागेल. युवा शेतकऱ्याचे बलिदान वाया जाऊ नये म्हणून राजेश खारोडे यांनी तेल्हारा तालुक्यातील शेतकरी चेतना यात्रा काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये गेल्या अकरा वर्षापासून ग्रामपंचायतवर झेंडा फडकाविलेला आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य तळागाळातील कार्यकर्ता राजेश खारोडे यांनी कोणतीही पदाची अपेक्षा न ठेवता 17 वर्षापासून निष्ठेने विश्वासु पणे प्रहार चा झेंडा घेऊन गावात गावात स्वतःच्या मोटरसायकलने फिरून गाव तेथे प्रहारच्या शाखा काढल्या. आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, अपंगांना सायकल वाटप, विधवा महिलांना साडी चोळीचा वाटप, गोरगरीब अपंग दिव्यांग लोकांना क्रांती दिन व शिवजयंतीनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम, करोना च्या काळात गोरगरीब दिव्यांगांना, अपंगांना जीवनावश्यकय वस्तूचे वाटप केला आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून चालू आहे. बच्चुभाऊ कडू यांचे अकोला जिल्ह्यातील एकमेव निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून राजेश खारोडे यांनी बच्चुभाऊ चा विश्वास संपादन केला आहे. बच्चू भाऊंनी सुद्धा या सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीमागे नेहमीच ताकद उभी केली आहे. अशा या सामान्य कार्यकर्त्याला असामान्य बनविण्याची ताकद फक्त आदरणीय वंदनीय प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्यातच आहे. राजेश खारोडे यांची प्रहारच्या महासचिव पदी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील निष्ठावान प्रहारसेवकां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविधा सामाजिक संस्था संघटना सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांनी अभिनंदन केले.