तळेगाव बाजार : हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तळेगाव बाजार येथील युवा शेतकरी यांनी सततच्या नापिकीमुळे घरच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना घडली.
तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील चाळीस वर्षीय शेतकरी दिपक पंजाबराव खारोडे या शेतकरी यांनी सततच्या नापिकीमुळे व कर्जामुळे तळेगाव बाजार शिवारातील घरच्या शेतात आंबाचे झाडाला नॉयलान दोरिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेचि माहिती मिळताच ठाणेदार धिरज चव्हाण यांनी त्वरित पि एस आय बगळेकर, पो का निलेश खंडारे, पो का धिरज साबळे, यांनी घटनास्थळी येऊन पचंंनामे करून प्रेत तपासणी साठी तेल्हारा रुग्णालयात पाठवले सदर घटना 16 सप्टेबंर रोजी सकाळी सहा वाजता उघडिस आलि.