मुंबई: संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अॅपल आयफोन 13 मालिकेचे मंगळवारी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे अनावरण झाले. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी आयफोन 13 (Apple iPhone 13 series) मालिकेतील 4 मोबाईलसोबत आणखी काही अद्ययावत उत्पादने सादर करून धडाका उडवून दिला. (Apple iPhone 13 series launched Biggest features of 4 new iPhones, price, availability, what’s inside the box and all key details for buyers)
जगभरातील टेक्नोसॅव्ही मंडळी जिची प्रतीक्षा करत होते, ती घडी मंगळवारी आली. पॅसिफिक टाईमनुसार सकाळी 10 वाजता आणि भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता अॅपलच्या संकेतस्थळावरून जगभरात लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू झाले आणि सीईओ टीम कुक एकामागोमाग एक नवी अत्याधुनिक उपकरणे सादर करू लागले.
आयपॅड 2021, आयपॅड मिनी, वॉच सीरिज सेव्हन, वॉच सीरिज थ्री, वॉच एसई यांची घोषणा झाली आणि त्यानंतर सर्वांना उत्कंठा लागलेल्या आयफोन 13 मालिकेतील चार अद्ययावत मोबाईलचे सादरीकरण कुक यांनी केले.
आयपॅड 2021 : अद्ययावत ए-13 चिपसेट, 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा.
मिनी आयपॅड : 8.3 इंची स्क्रीन, 12 एमपी अल्ट्रावाईड कॅमेरा, स्टिरीओ स्पीकर्स.
आयपॅडच्या भारतातील किमती :
वायफाय मॉडेल 30,900 रुपये व वायफाय+सेल्युलर मॉडेल 42,900 रुपये. की-बोर्डसाठी 13,900 रुपये आणि स्मार्ट कव्हरसाठी 3,500 रुपये वेगळे मोजावे लागतील.
वॉच सीरिज सेव्हन : मोठा स्क्रीन, 40 टक्के कमी बॉर्डर, बाईक राईड आणि फॉल डिटेक्शन. किंमत 399 डॉलर्सपासून.
आयफोन 13 मिनी (5.4 इंची स्क्रीन) व आयफोन 13 (6.1 इंची स्क्रीन), 1200 निट्स ब्राईटनेस, एक्सडीआर, नॉचचा आकार 20 टक्के कमी, सिक्स कोअर सीपीयू, फोर कोअर जीपीयू, मशिन लर्निंगसाठी 16 कोअर न्यूरल इंजिन, अद्ययावत कॅमेरा, 5जी रेडी, किंमत 699 डॉलरपासून.
भारतात या मोबाईलच्या किमती 69,900 रुपये आणि 79,900 अशा असतील. प्री-ऑर्डर 17 सप्टेंबर आणि विक्री 24 सप्टेंबरपासून.
आयफोन 13 प्रो (किंमत 999 डॉलरपासून, भारतात 1,19,900 रुपयांपासून) व आयफोन प्रो मॅक्स (किंमत 1099 डॉलरपासून, भारतात 1,29,900 रुपयांपासून) : 120 हर्टझ प्रोमोशन रिफ्रेश रेट डिस्प्ले.
भारतात आयफोन 13 प्रो येण्यासाठी 30 ऑक्टोबर आणि आयफोन 13 प्रो मॅक्स येण्यासाठी 13 नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.