अकोला: दि.१५: जिल्ह्यासाठी ऑक्टोबर महिन्यासाठी लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य, नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे.
वाटप परिमाण व दर याप्रमाणे-
१. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी (गहू/मका/ज्वारी) तीन किलो प्रतिव्य क्ती,दर दोन रुपये प्रति किलो.
२. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी तांदूळ दोन किलो प्रतिव्यक्ती, तीन रुपये प्रति किलो.
३. अंत्योदय अन्न योजना गहू- १५ किलो प्रति कार्ड, दोन रुपये प्रति किलो.
४. अंत्योदय अन्न योजना तांदूळ-२० किलो प्रति कार्ड, तीन रुपये प्रति किलो.
५. एपीएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्यांकरीता गहू-चार किलो प्रति व्यक्ती, दोन रुपये प्रति किलो.
६. एपीएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्यांकरीता तांदूळ- एक किलो प्रति व्यक्ती, तीन रुपये प्रति किलो.
७. नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांकरीता-एक किलो प्रति शिधापत्रिका, २० रुपये प्रतिकिलो.
८. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी गहू, तांदूळ- प्रतिसदस्य प्रतिमाह तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ (मोफत)
९. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना गहू व तांदूळ- प्रतिसदस्य प्रतिमाह तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ (मोफत)
हे वाटप परिमाण गोदामातील साठ्याच्या व लाभार्थ्यांच्या संख्या उपलब्धतेनुसार राहील,असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी कळविले आहे.