अकोला, दि.१५: केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो तर्फे केंद्र शासनाच्या योजनांची प्रसिद्धी केली जाते. त्याअनुषंगाने भारत सरकार कडुन राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती प्रभावीपणे लोकांपर्यत पोहचवण्यासाठी सबंधित व्यक्तिचा डेटा बेस तयार केला जात आहे.
याच विषयाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या योजनेसाठी जिल्ह्यातील नामवंत, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडुंची माहिती मागविण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सन २०२१७-१८,२०१८-१९, २०१९-२०या वर्षात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शालेय स्पर्धेत व अधिकृत राज्य खेळ संघटना मार्फत आयोजीत अधिकृत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडुंनी आपल्या स्पर्धा कामगिरीच्या प्रमाणपत्राच्या छायाप्रतीसह आपली माहिती शुक्रवार दि.१७ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई स्टेडीयम, अकोला येथे कार्यालयीन वेळेत सादर करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.