अकोला – जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची सभा जिल्हा पशु सर्व चिकित्सालय येथे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यासभेस जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. तुषार बावणे, जिल्हा पशु वैद्यकीय सर्वचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविण राठोड, पदव्युत्तर पशुवैद्यकीय संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद थोरात, डॉ. योगीराज वंजारे, डॉ. प्रकाश गवळी, पशुधन विकास अधिकारी सी.एम. देशमुख, प्रकाश वाघमारे, विजय शिवशंकर जाणी, विशाल बोरे, सुधीर कडू, सचिन आयवडे, मिलिंद निवाने, संदीप वाघाडकर यांची उपस्थिती पार पडली. यावेळी ग्रामपंचायत अंतर्गत असलेले गायरानवरील अतिक्रमण, लोकसहभागातून मुक्त करून लोकसहभागातून गायरानावर चारा लागवड करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कानशिवणी येथील वनविभागाच्या जमिनीवर तलाव बांधणे या प्रकल्पाबाबत वनविभागाने पाहणी अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. उघड्यावर मांस विक्री करीता विशिष्ट बाजार व्यवस्था बाबत चर्चा करण्यात आली व इतर विविध विषयावर चर्चा करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांनी संबंधीत विषयावर कार्यवाही करण्याबाबत सांगितले.