रिधोरा (पंकज इंगळे)- बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथे दिनांक 12 वार रविवार रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने ग्रामीण भागामध्ये होत असलेले रक्तदान शिबिर ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे रिधोरा सारख्या ग्रामीण भागामध्ये रक्तदान शिबिर होणे आदर्श बाब आहे.
या रक्तदान शिबिराचे आयोजन रिधोरा येथील पंचशील क्रीडा मंडळ व शरद दंदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण रक्तपेढी अकोला यांनी आपल्या सर्व टीम सह रक्तदान शिबिरासाठी संपूर्ण टीम यामध्ये डॉ.नंदराज मीना, अश्विनी वाहूरवाघ, ऋतुजा देठे, डॉ.प्रणय वाकोडे, वैद्य समुपदेशक शिल्पा तायडे, अधीपरिचारक सतिष उकर्डे, परिचर संतोष शिरसाट, वाहन चालक रुपेश तायडे, या सर्वउपचार रुग्णालय अकोला हे सर्वजण शिबिरासाठी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरासाठी रिघोर येथील तरुणांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये 63 तरुणांनी रक्तदान केले. यामध्ये पंचशील क्रीडा मंडळ रिधोरा व इतर सर्व मित्र परिवार इतरांनी सहभाग नोंदवला. शिबिरा प्रसंगी सहभाग घेतलेल्या सर्व तरुणांनी कोरोना महामारी मुळे सर्वांनी सोशल डिस्टन्स सर्व नियमांचे पालन केले. याप्रसंगी सर्वउपचार रुग्णालय अकोला येथून आलेल्या सर्व डॉ. टिम व इतराणी या तरुणांना शुभेच्छा देऊन हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पाडला.