अकोला : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे हे रविवार दि. 12 सप्टेंबर रोजी जिल्हा दौरा येत आहे.
त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे :
रविवार दि. 12 रोजी सकाळी 10 वाजता बुलडाणा येथून शासकीय वाहनाने अकोला येथे आगमन व राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाच्या जागेची पाहणी. सकाळी 11 वाजता अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांचेसमवेत आढावा बैठक, दुपारी 12 वाजता हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष महानगर बैठक, दुपारी दोन वाजता श्रीमती भारती निम, कार्याध्यक्ष व माजी महिलाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष महानगर, लहान उमरी, अकोला येथे राखीव व दुपारी तीन वाजता शासकीय वाहनाने अमरावती मार्गे नागपूर कडे प्रयाण.