तेल्हारा : तालुक्यातील जस्तगाव येथील एका पन्नास वर्षीय शेतकऱ्याने जस्तगाव पाथर्डी शेतरस्याजवळील त्याच्या शेताजवळ निबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी घडली आहे मृतक शेतकऱ्याच्या अंगावर महिन्दा फायन्स, कोठा बॅकेसह आकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सोने तारण कर्ज देखील असल्याचे सांगण्यात आहे.
आत्महत्या केलेल्या दुदैवी शेतकऱ्याचे नाव सारंगधर महादेव नवलकार असे आहे दरवर्षी होणारी नापीकीने सारंगधरच्या अंगावरील कर्ज कमी होण्याऐवजी वाढतच होते त्यामुळे तो चांगलाच खचला होता त्यामुळे त्याने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे त्याच्या कुटुबियाकडुन सांगण्यात आले आहे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे मृतक सारंगधरच्या मागे पन्नी मुलगा मुलगी सुन असा आप्त परिवार आहे या घटनेने जस्तगावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे