तेल्हारा : शहरातील सौंदर्यात भर टाकणाऱ्या महाराजा अग्रसेन टावरवर होल्डिंग लावल्यास होल्डींग लावणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करा या मागणीसह विविध मागण्या करणारे निवेदन अग्रवाल समाजाच्या वतीने तेल्हारा पालिकेच्या अध्यक्षा सौ.जयश्रीताई पुंडकर यांना आज ता 9 गुरुवार रोजी देण्यात आले यावेळी नगरसेवक राजेश खारोडे हे उपस्थित होते.
शहराचे वैभव असणाऱ्या व सौंदर्यात भर टाकणाऱ्या महाराजा अग्रसेन टावर वर होल्डींग लावण्यास बंदी आहे. असे असतांना देखील वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे, सामाजिक संघटनांचे व इतर असे जाहिरात फलक नेहमीच लावण्यात येतात.
त्यामुळे या ठिकाणी कुठलेही फलक लागणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी तसेच फलक लावल्यास लावणार्याविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, टावर लगत विविध व्यावसायिक नेहमी रेकड्या व दुकाने थाटतात व त्याठिकाणी घाण करतात त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते म्हणून या ठिकाणी दुकाने लावण्यास बंदी घालण्यात यावी.
अग्रसेन जयंती पूर्वी टावरवरील लोखंडी ग्रील ची रंगरंगोटी करण्यात यावी व टावरची नियमित सफाई करण्यात यावी तसेच टावरवर असलेल्या बंद घड्याळ काढून त्याठिकाणी नवीन घड्याळ बसविण्यात यावे आदी मागण्या निवेदनात नमूद आहे निवेदनावर महेंद्र गोयनका, योगेश भारुका, धर्मेश चौधरी, मनीष गोयनका, रवी गाडोदिया, निरव पाडिया, पुरण अग्रवाल, नानकचंद अग्रवाल, गोपाल पडिया, विनोद पडिया, धिरज पडिया, सागर पडिया, सुरेश अग्रवाल, रवी पाडिया, अनुराग अग्रवाल, विजय अग्रवाल, विजय अग्रवाल, नियीन अग्रवाल, विनोद बजाज, शिवम अग्रवाल, बिपीन अग्रवाल, दीपक गाडोदिया, निलेश अग्रवाल, आनंद पडिया, गोपाल अग्रवाल, गौतम अग्रवाल यांच्यासह अनेक अग्रवाल बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.