• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अर्थकारण

BRICS : विकसनशील देशांसाठी ‘ब्रिक्स व्यासपीठ’ महत्वाचे : पंतप्रधान मोदी

Our Media by Our Media
September 10, 2021
in अर्थकारण, आंतराष्ट्रीय, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, राजकारण
Reading Time: 1 min read
94 1
0
BRICS

BRICS

15
SHARES
680
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : विकसनशील देशांच्या प्राथमिकतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ब्रिक्स व्यासपीठाचा उपयोग होत राहिल्याने अशा देशांसाठी हा मंच बराच महत्वाचा आहे, असे प्रतीपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी, १३ व्या ब्रिक्स (BRICS) शिखर संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून केले.

भारताची उदयोन्मुख अर्थव्यवस्थेचे उत्तर उदाहरण जगासमोर आहे. ब्रिक्स संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणे हे माझ्यासह देशासाठी आनंदाची बाब असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. ब्रिक्स देशांकडून बरेच सहकार्य लाभले आहे. कोरोना संकटाकाळात देखील सर्वांनी एकत्रित येवून काम केले. खांद्याला खांदा लावून महारोगराईच्या विरोधातील लढ्याला मजबूत केले, असेही पंतप्रधान त्यांच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

पुढील १५ वर्षांमध्ये ‘ब्रिक्स’चे व्यासपीठ अधिक उपयोगी ठरावे याकरिता प्रयत्न करावे लागतील. अशात भारताने आपल्या अध्यक्षतेखाली निवडलेल्या संकल्पनेतून या बाबीला देण्यात आलेल्या प्राथमिकतेची प्रचिती येते. ‘BRICS@15 : सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-ब्रिक्स सहकार्य’ ही संकल्पना संमेलनाची आहे. कोऑपरेशन फॉर कंटीन्यूटी, कॉन्साॉलिडेशन अँड कंसेन्सस हेच चार ‘सी’ ब्रिक्स देशाच्या भागीदारीचे आधार आहे.

ब्रिक्स ने न्यू डेव्हलपमेंट बॅक, एनर्जी रिसर्च कॉरपोरेशनसारख्ये मंच सुरू करण्यात आले आहे. गर्व करण्यासारख्या अनेक बाबी आहेत.पंरतु, आत्मसंतुष्ट होता कामा नये. पुढील १५ वर्षांसाठी ब्रिक्स उपयोगी ठरावी, हे निश्चित करावे लागेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

यावर्षी कोरोना महारोगराईमुळे उद्भवलेल्या स्थितीत देखील ब्रिक्सच्या १५० हून अधिक बैठका तसेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यातील २० मंत्रीस्तरावरील होते.परंपरागत क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासह ब्रिक्सच्या अजेंडा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावर्षी ब्रिक्स ने अनेक गोष्टी पहिल्यांदाच केल्या. नोव्हेंबर महिन्यात जल संसाधन मंत्री ब्रिक्स फॉर्मेटमध्ये पहिल्यांदा भेटणार आहेत.

ब्रिक्सने (BRICS) पहिल्यांदाच मल्टीलिटरल सिस्टम्सच्या बळकटी तसेच सुधारणेसंबंधी एक स्टॅन्ड घेतला आहे. ब्रिक्स ‘काउंटर टेरिरिजम एक्शन प्लॅन’ देखील मानण्यात आला आहे. नुकतेच पहिल्या ब्रिक्स डिजिटल हेल्थ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तांत्रिक मदतीने आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल ठरले. नोव्हेंबर महिन्यात जल संसाधनमंत्री ब्रिक्स फॉर्मेटमध्ये पहिल्यांदा एकत्रित येणार असल्याचे ते म्हणाले.

बैठकीला ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोलेसनारो, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सायरिल रामाफोसा उपस्थित होते. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष मारकोस ट्रोयजो, ब्रिक्स व्यवसाय परिषदेचे अस्थायी अध्यक्ष ओंकार कंवर आणि ब्रिक्स महिला व्यवसाय आघाडीच्या अस्थायी अध्यक्ष डॉ. संगीता रेड्डी यांनी त्यांच्या क्षेत्राशी संबंधित अहवाल सादर करतील.

आपल्या अध्याक्षतेच्या काळासाठी भारताने चार प्राधान्य क्षेत्रांची रूपरेषा मांडली होती. यात बहुक्षेत्रीय प्रणालीतील सुधारणा, दहशतवाद विरोध, एसडीजी शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञान साधनांचा वापर करणे आणि व्यक्तींमधील परस्पर संबंध दृढ करण्यासाठी एक्सचेंज प्रोग्रॅम यांचा त्यात समावेश आहे. या क्षेत्रांव्यतिरिक्त कोरोना महारोगराईच्या प्रभावावर आणि सध्याच्या अन्य जागतिक समस्यांवर देखील विचारांची देवाणघेवाण बैठकीतून करण्यात आली.

Tags: BRICSnewsPM Modi
Previous Post

इंडोनेशियाच्या ज्वालामुखीजवळ ७०० वर्षांपूर्वीचा गणपती बाप्पा!

Next Post

या गणराया, विघ्न हराया…!

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
या गणराया, विघ्न हराया...!

या गणराया, विघ्न हराया...!

Saudi Arabia

Saudi Arabia : अखेर सौदी अरेबियाचं तालिबानी प्रेम जागं झालंच !!!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.