अकोला : वर्तमान परिस्थितीत संपुर्ण जिल्ह्यात अति पावसाने धुमाकुळ घातला असुन चार जणांचा मृत्यू झाला तर तब्बल लहान मोठी जनावरे पावसाने दगावली. खरीपाचे पिक शंभर टक्के वाया गेले असुन कापुस, सोयाबीन कंबराएवढ्या पाण्यात आहेत. एकुणच काय तर शेतकरी उद्धवस्त झाला. माय-बाप सरकारने ओला दुष्काळ जाहिर करून शेतकर्यांना तात्काळ बांधावर प्रति हेक्टरी 50,000 रूपये देण्याची गरज आहे. मात्र राज्यातील ठाकरे सरकारवर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही.मागच्या दोन वर्षापासुन जाणिवपुर्वक सरकार सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर दुर्लक्ष करत आहे. अतिवृष्टी अनुदानाचे पैसे दिले नाहीत. शेतकर्यांना कवडीचा विमा मिळाला नाही आणि आता उद्धवस्त शेतकरी झाला तरी सरकार मदत करेल का नाही? यावर प्रश्नचिन्ह आहे.
एकही मंत्री अद्याप शेतकर्यांचे आश्रु पुसायला सुद्धा गेल्याचं कुठं ऐकिवात नाही. पिके पाण्याखाली गेली. महापुराने जमिनी खरडुन उद्धवस्त झाल्या. एवढी भयानक परिस्थिती कधीच झालेली नव्हती. पंचनामे, पाहणी कागदोपत्री घोडे नाचवण्यापेक्षा सरसकट शेतकर्यांना सात-बारा बघुन मदत करण्याची गरज आहे.
मागच्या काही दिवसापासुन मुसळधार पाऊस पडत असुन जिल्ह्यात अति पाऊस झाल्याने खरीपाची पिके 100 टक्के उद्धवस्त झाली आहेत. जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस तर काही ठिकाणी दुप्पटीने पाऊस पडला. पिके आजही कंबरेएवढ्या पाण्याखाली असुन सोयाबीन, कापुस, तुर 100 टक्के उद्धवस्त झाली आहेत. ऊसाचे पिक पुराच्या तडाख्यात सापडले तर भुईसपाट पावसाने झाले. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार जनावरे दगावली तर चार लोकांचा जीव पाण्यात वाहुन गेला आहे. अनेकांची पक्की घरे पडली.जनावरांची गोठे व इतर नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं. एकुण पर्जन्यमान टक्केवारीच्या तुलनेत पाऊस 109 टक्के जास्त मिमि झालेला आहे. वर्तमान परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य माणुस फार मोठ्या संकटात सापडला असुन शेतकरी 100 टक्के उद्धवस्त झाला आहे.
वास्तविक पाहता ओला दुष्काळ जाहिर करून सरकारने तातडीची मदत द्यायला हवी.नैसर्गिक संकटात पंचनामे,पाहणी दौरे ही नाटकं करून कागदोपत्री घोडे हे सरकार राबवत आहे.कोकणात पावसाने धुमाकुळ घातला.महाराष्ट्रात अजुन पंचनामे सुरूच आहेत.खरं तर अशा नैसर्गिक संकटात शेतकर्यांना अवघ्या काही तासांत बांधावर जाऊन रोखीने मदत करण्याची गरज आहे.जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाल्यामुळे खरीपाचे पिक वाया गेले. सात-बारा पाहुन सरसकट मदत खर्या अर्थाने सरकारने द्यायला हवी.यापुर्वी कधीच असा पाऊस पडला नाही. त्यापेक्षा कितीतरी पटीने पाऊस अनेक मंडळात झाल्याचे चित्र समोर येत आहे. नदी, नाल्या, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.
रोज कोसळणार्या पावसाची भिती जनतेच्या मनात असुन माईस लेकरू पारखं असं चित्र डोळ्यासमोर दिसत असताना सरकार मात्र डोळ्यावर पट्टी बांधुन बसल्यासारखं कसं बघतं? हाच प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे. एक गोष्ट खरी आहे राज्यातील ठाकरे सरकारवर शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचा विश्वासच राहिलेला नाही.या वर्षात अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान त्याचा पैसा अद्यापही शेतकर्यांना मिळालेला नाही. ठाकरे सरकारने फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या योजना अकोला सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल क्रीडा संस्कृती भवन कार्यान्वित होऊ दिली नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकर्यांना विमा दोन वर्षात कवडीचा मिळाला नाही.राजकिय दुराग्रह ठेवुन हे सरकार जनतेच्या भावनेशी खेळत आहे.
विद्यमान सरकारमधील मंत्री सत्तेच्या चंगळवादात मश्गुल असुन अतिवृष्टीने झालेलं नुकसान पाहण्यासाठी येण्यास त्यांना वेळही नाही.अगोदरच विमा मिळाला नाही म्हणुन शेतकर्यांच्या मनात प्रचंड संताप आहे.2019-20 पासुन कवडीचा विमा शेतकर्यांना मिळाला नाही.करोडो रूपये शेतकर्यांचे विमा कंपनीने लुबाडले. त्यात सत्ताधार्यांनी आर्थिक हात धुवुन घेतले ष दिला नाही असं हे सरकार आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संकटात आता हे सरकार मदत करेल का नाही? यावरच सर्वसामान्य जनता आणि शेतकर्यांचा भरवसा राहिलेला नाही. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आणि चित्र पाहता या सरकारने कागदोपत्री घोडे नाचवण्याची आता वेळ निघुन गेलेली आहे. काही मदत करायची असेल तर शेतकर्यांच्या बांधावर जावुन संकटात सापडलेल्या लोकांना प्रशासनाच्या वतीने रोखीच्या स्वरूपाने मदत केली तरच दिलासा मिळु शकेल.
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे दोन वर्षापुर्वी सत्तेत नसताना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानपोटी रूपये 50,000 हेक्टरी द्यावेत अशी मागणी करत होते आणि आता मागणी करणारेच राज्यात माय-बाप झाले. मग त्यांची हेक्टरी 50,000 रूपायाची मागणी गेली कुठं? याची आठवण आता शेतकरी करून देताना दिसत आहेत. ठाकरे सरकार ची भुमिका नैसर्गिक संकटात शेतकर्यांना मदत करण्याची दिसतच नाही. कारण पश्चिम महाराष्ट्रात आणि अकोला जिल्ह्यात कोकणात निसर्गामुळे झालेलं प्रचंड नुकसान ज्यातुन जनता अद्याप सावरलेली नाही. त्या लोकांना आजही कवडीची मदत या सरकारने दिलेली नाही.बावन दिवस उलटल्यावर सुद्धा मदत दिली नाही त्यापेक्षा कडवी नजर मदतीच्या बाबतीत ठाकरे सरकारची अकोला व विदर्भा संदर्भात नकारात्मक राहिलेली आहे.
अनेक जनहिताच्या योजना रद्द केल्या.साधं पशुधन कार्यालय नागपूरला रातोरात पुण्याला हलवलं यावरूनच सत्ताधार्यांची नियत कशी आणि किती आहे?हे लक्षात येतं. कोरोनासारख्या संकटात आरोग्याची साधन सामुग्री गोरगरीबांच्या जीव रक्षणासाठी वेळेवर मिळालेली नाही. त्यापेक्षा अधिक एखाद्या महत्वाच्या इंजेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार झाला. त्यामुळे आता एवढं संकट नैसर्गिक आलं असताना शेतकर्यांना आणि सर्वसामान्य जनतेला सरकार कशा प्रकारे मदत करणार? किंवा करणार का नाही? याबाबत लोकांच्या मनात फार मोठा संशय निर्माण झालेला आहे. साधा विमा जरी शेतकर्यांना दिला तरी या संकटावर मात करायला बळ निश्चित येईल. पण सत्ताधार्यांनी विमा कंपनीसोबत अफरातफर करून आर्थिक लाभ घेतल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असुन शेतकर्यांना विमा मिळणारच नाही हे चित्र आता दिसत आहे.
सरकार कुठल्याही पक्षाचे असो.सामान्य जनतेसाठी माय-बाप असतं.ठाकरे सरकारने अकोला जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर राजकारण न करता संकटात आर्थिक हातभार लावावा अशी मागणी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे आहे. अशा संकटात हेक्टरी 50,000 रूपये रोख शेतकर्यांच्या बांधावर येवुन दिले तरच शेतकरी जगेल आणि ओला दुष्काळ जाहिर करून त्याचे निकष लावण्याची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे. सद्या तरी अकोला जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकुळ घातला असुन खरीपाची पिके 100 टक्के वाया गेली आहेत. हवामान अंदाजानुसार चालु महिन्यात प्रचंड पाऊस पडणार.
त्यामुळे खरीपाचं कुठलंही पिक पदरात पडणारच नाही.सरकारने डोळे उघडावेत आणि संकटात मदत करावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ करत आहे सरकारने याबाबत बाबत शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यास शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांना महागात पडेल असा इशारा आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात, रवी गावंडे, श्रीकृष्ण मोरखडे, महापौर अर्चना मसने, नयना मनात कर, श्रावण इंगळे, मनीराम टाले, शिवाजीराव देशमुख, प्रभाकरराव मानकर, बाळासाहेब आपोतीकर, मनोहर राहणे, माधव मानकर, गणेश कडारकर, किशोर पाटील, योगिता पावसाळे, कुसुम भगत, सचिन देशमुख, केशव ताथोड, रमेश अप्पा, खोपरे किशोर गुजराती, अशोक गावंडे, गजानन उंबरकार, महेंद्र गोइंका, भूषण कोकाटे, रितेश समाज कर, अमोल साबळे, महेंद्र पेजावर, राजू काकड, रमण जैन, अंबादास उमाळे, कनक कोटक, अनिल गावंडे, रामदास लांडे, गीतांजली शेगोकार, आदींनी केली आहे.