तेल्हारा : वंचित बहुजन आघाडी ने २७ ऑगस्ट ला तेल्हारा नगर परिषद ला बेशरम चे तोरण बांधले होते आणि ८ दिवसात शहरात फवारणी करा अन्यथा नगर परिषद मुख्याधिकारी ह्यांच्या कक्षात डेंगू चे डास सोडू असे सांगितले होते. पण फवारणी आज करू उद्या करू असे करत नगर परिषद ला अजून पण फवारणी चा मुहूर्त मिळाला नव्हता. म्हणून वंचित बहुजन आघाडी ने स्वतः तेल्हारा शहरात फवारणी केली. फवारणी ला सुरुवात नगर परिषद पासून च करण्यात आली.
तेल्हारा च्या नगराध्यक्षा ह्यांच्या पण घराजवळ फवारणी वंचित ने करून दिली. ह्या वेळी ३ मोठ्या फॉग मशीन आणि शेकडो लिटर डिझेल आणि औषध ची तरतूद वंचित बहुजन आघाडी ने केली. ह्या करीता शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी विकास पवार, सतीश मामनकार, आनंद बोदडे, नितीन पोहरकार, नितीन तायडे, लखन सोनटक्के, सचिन गर्जे, मुजाहिद कुरेशी, अजय पोहरकार, प्रमोद चव्हाण, जय पोहरकार, मनोज पोहरकार, अविनाश पोहरकार, अक्षय दामोदर, गौतम पोहरकार, मिलिंद हिवरळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
_____________
आज आम्ही तेल्हारा शहरात फवारणी केली आहे. सुरुवात आमच्या निर्लज्ज नगर परिषद पासून केली. न. प ने अजून पण फवारणी नाही केली तर मुख्याधिकारी ह्यांना दिलेला इशारा आम्हला करून दाखवावा च लागेल. न प ने लोकांच्या सहनशक्ती ची परीक्षा घेऊ नये
विकास पवार