प्रीतम मांडके
* रिलायन्स इंडस्ट्रीजकडून पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीसाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्याची घोषणा. पुढील दहा वर्षात ग्रीन हायड्रोजन एनर्जीची किंमत 1 डॉलर प्रती किलोपेक्षा खाली आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट. सध्या ही किंमत 3.6 डॉलर ते 5.8 डॉलर प्रती किलोच्या दरम्यान आहे.
* देशातील महत्त्वाची जीवन विमा कंपनी ‘एचडीएफसी लाईफ’ने याच क्षेत्रातील कंपनी ‘एक्साईड लाईफ’ खरेदी करण्याचा निर्णय घेतला. एकूण 6687 कोटींना ही खरेदी केली जाणार. 30 जूनच्या आकडेवारीनुसार एक्साईड लाईफचे व्यवस्फान अंतर्गत बाजारमूल्य (एयूएम) 18480 कोटी रुपये आहे. कंपनी खरेदी करण्यासाठी एचडीएफसी लाईफचे 87 दशलक्ष समभाग 685 रु. प्रतिसमभाग दरावर जारी केले जाणार. तसेच 726 कोटी रुपये रोख (कॅश पे आऊट) स्वरूपात हस्तांतरित केले जाणार.
* ऑगस्ट महिन्यात ‘जीएसटी’च्या स्वरूपात एकूण 1 लाख 12 हजार कोटींचा कर सरकारजमा झाला. मागील महिन्याच्या तुलनेत कर संकलनात 3.8 टक्क्यांची घट झाली. परंतु मागील वर्षाची तुलना करता, ही वाढ 30 टक्के आहे.