तमिळनाडू – सद्या भारतात कोरोना लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.काही दिवसांपूर्वी भारतात एकच दिवसात १ कोटी लसीकरण करण्यात आले होते.ते एका दिवसात सर्वात जास्त लसीकरण होता भारतातला.
प्रत्येक राज्य आपल्या सुविधेनुसार कोरोना ला नियंत्रित करण्यासाठी उपाय योजना करीत आहे.अश्यातच तमिळनाडू मधील निलगिरी जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढला आहे आणि तो आदेश चर्चेचा विषय ठरला आहे.
त्या आदेशा प्रमाणे तमिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्हात कोरोना लसीचे डोस झालेल्या नागरिकांनाच दारू विकत घेता येईल.दारू घेण्या आधी लसीचा प्रमाणपत्र दाखवणं बंधकारक करण्यात आल आहे.दारू पिणारे नागरिक लस बाबत गंभीर नाहीत म्हणून असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.