NEET UG आणि NEET PG ची परीक्षा येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. NEET PG ही परीक्षा 11 सप्टेंबर 2021 रोजी तर NEET UG 12 सप्टेंबर 2021 ला होणार आहे. त्यामुळे या परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र (NEET UG & PG Admit Card) लवकरच अधिकृत वेबसाईटवर जारी केले जाणार आहेत.NEET UG परीक्षा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे (NTA) घेतली जाणार आहे NEET PG परीक्षा राष्ट्रीय शिक्षण मंडळाद्वारे (NEB) घेतली जाणार आहे.
ही परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी लवकरच आपलं प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड (NEET UG and NEET PG Exam dates) करू शकणार आहेत. या पूर्वीच्या तारखेच्या म्हणजेच 18 एप्रिलच्या नियोजित परीक्षेसाठी पूर्वी जारी केलेले प्रवेशपत्र वैध नाहीत. उमेदवारांना नवीन प्रवेशपत्र डाउनलोड करावं लागणार आहे. NEET UG परीक्षेसाठी प्रवेशपत्रं (How to download admit cards for NEET UG and NEET PG exams) परीक्षेच्या तीन दिवस आधी दिली जातील. प्रवेशपत्र जारी करण्याच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
या तारखांना मिळू शकतं Admit card
neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून NEET PG साठी उमेदवारांना Admit card डाउनलोड करता येणार आहे. तर nbe.edu.in या अधिकृत वेबसाइटवरून NEET UG साठी उमेदवारांना Admit card डाउनलोड करता येणार आहे. NEET UG चे प्रवेशपत्र 9 सप्टेंबर 2021 आणि NEET PG प्रवेशपत्र 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2021 दरम्यान जारी केले जाऊ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
NEET UG पुढे ढकलण्याची मागणी
NEET UG साठी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनही (NEET UG Exam 2021 Registration) केलं आहे. मात्र आता वाढत कोरोनाचा प्रादुर्भाव बघून ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी ट्विटरवर चांगलीच जोर धरत आहे. तसा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे. सध्या #RescheduleNEETUG हा हॅशटॅग वापरून लाखो नेटकरी NEET UG पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. JEE ऍडव्हान्स ही परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते तर NEET UG ही परीक्षा का नाही? असा सवालही अनेक नेटकरी विचारत आहेत.