कमकुवत जागतिक संकेत आणि रुपयाच्या मजबुतीमुळे आज भारतीय बाजारात सोन्याचे भाव घसरलेत. भारतातील सोन्याचे भाव आज दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर राहिले, तर चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर वायदे सोन्याचे भाव 0.03 टक्क्यांनी प्रति 10 ग्रॅम कमी झाले, तर सप्टेंबर वायदे चांदी (Silver) 0.09 टक्क्यांनी कमी झाली.
मागील सत्रात म्हणजे बुधवारी सोने स्थिर होते, तर चांदी 0.76 टक्के वाढली. बुधवारी देशाची राजधानी दिल्लीच्या सराफामध्ये 99.9 टक्के सोन्याचे भाव 6 रुपयांनी घसरून 46,123 रुपयांवर आले. चांदीचे भाव 515 रुपयांनी घटून 61,821 रुपये प्रति किलो झाले.
गुरुवारी एमसीएक्सवरील ऑक्टोबर वायदा सोन्याचे भाव 16 रुपयांनी कमी होऊन 47,052 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर स्थिर राहिले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फेडरल रिझर्व्हच्या तात्पुरत्या योजनेसाठी नॉन-फॉर्म पेरोल डेटा महत्त्वपूर्ण आहे. स्पॉट सोन्याची किंमत 1,814.54 डॉलर प्रति औंस होती. सोन्याप्रमाणे चांदीमध्येही कमजोरी होती. सप्टेंबर फ्युचर्समध्ये चांदी 60 रुपयांनी घसरून 63,633 रुपये प्रति किलो झाली. चांदीच्या किमतींना पुरवठ्याची चिंता आणि उत्पादन कार्यात सुधारणा यामुळे समर्थन मिळाले.
सॉवरेन गोल्ड बाँड योजनेची सहावी मालिका सुरू झाली. तुम्ही यामध्ये 3 सप्टेंबर 2021 पर्यंत गुंतवणूक करू शकता. सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) साठी इश्यू किंमत 4,732 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली. ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकार 50 रुपयांची सूट देत आहे. ऑनलाईन किंवा डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळेल. अशा स्थितीत तुम्ही 10 ग्रॅम सोन्यावर 500 रुपयांच्या सूटचा लाभ घेऊ शकता.
हॉलमार्क पाहून सोने खरेदी करा
हॉलमार्क पाहिल्यानंतर नेहमी सोने खरेदी करा. कारण याद्वारे प्रमाणित होणे म्हणजे सोने खरे आहे. सर्टिफिकेशन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने हे प्रमाणपत्र दिले आहे. त्याच वेळी, स्थानिक ज्वेलर्स कधीकधी हॉलमार्कशिवाय दागिने विकतात. या परिस्थितीत तुम्हाला ते स्वतःच ओळखावे लागेल.