अकोला दि.31: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवार दि. 4 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील 33 उपकेंद्रावर सकाळी 11 ते 12 या वेळेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग दुय्यम सेवा संयुक्त पुर्व परिक्षा-2020 चे आयोजन होणार आहे. परिक्षा केंद्रावर गैरप्रकार, कायदा व सुव्यवस्था निर्माण होवू नये व परिक्षा शांततेत पार पाडण्याकरिता दि. 4 सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते रात्री आठवाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या आतील संपुर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरिल लागून असलेल्या 100 मीटर परिसरात कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.
परिक्षा उपकेंद्र : शिवाजी आर्ट कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेज मोर्णा बिल्डींग शिवाजी पार्क अकोट रोड अकोला, खंडेलवार ज्ञानमंदिर कॉन्व्हेन्ट गोरक्षण रोड अकोला, श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय मुर्तीजापुर रोड नेहरु पार्क अकोला, सिताबाई कला महाविदयालय सिव्हील लाईन रोड अकोल, एल.आर.टी. कॉलेज ऑफ रतनलाल प्लॉट अकोला भाग-1, एल.आर.टी.कॉलेज ऑफ कॉमर्स रतनलाल प्लॉट अकोला-भाग-2, माउंट कारमेल स्कुल अग्रसेन चौक स्टेशन रोड अकोला, भारत विदयालय तापडीया नगर अकोला, शिवाजी आर्ट कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेज पुर्णा बिल्डींग शिवाजी पार्क अकोट रोड अकोला, श्री शिवाजी हायस्कूल मुख्य शखा देशमुख पेठ शिवाजी पार्कजवळ अकोट रोड अकोला, भिकमचंद्र खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्लॉटस डाबकी रोड जुने शहर अकोला, जि. एस. कॉन्व्हेन्ट मुख्य डाक घरामागे अकोला, कोठारी कॉन्व्हेन्ट विदयानगर गोरक्षण रोड अकोला, नोएल इंग्लिश हायस्कूल विभागीय वर्क शॉपच्यामागे कौलखेड रोड अकोला, जागृती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय रणपीसे नगर अकोला, उस्मान आझाद ऊर्दू हायस्कूल रतनलाल प्लॉट अकोला, हॉलीक्रॉस कॉन्व्हेन्ट हायस्कूल जठारपेठ चौक अकोला, गुरुनानक विद्यालय गांधीनगर सिधी कॅम्प अकोला, श्री शिवाजी विद्यालय हरिहर पेठ जुने शहर अकोला, ज्युबिली इंग्लिश हायस्कूल ज्युनिअर कॉलेज शिक्षण संकुल रामदास पेठ अकोला, न्यु इंग्लिश हायस्कूल शिक्षण संकुल रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या बाजूला अकोला, राधाकिसन लक्ष्मीनारायन तोष्णीवाल कॉलेज ऑफ सायन्स सिव्हील लाईन रोड अकोला, मोहरीदेवी खंडेलवार विदयालय गोडबोले प्लॉट डाबकी रोड जुने शहर अकोला, डि.ए. व्ही. कॉन्व्हेन्ट स्कूल मळात्मा गांधी रोड अकोला, मेहरबानु ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स गांधी रोड अकोला, खंडेलवाल इंग्लिश स्कुल,गोडबोले प्लॉट डाबकी रोड जुने शहर अकोला, मनुताई कन्या शाळा सिटी कोतवाली पोलीस स्टेशन जवळ टिळक रोड अकोला, अकोला आर्टस कॉमर्स सायन्स कॉलेज सहकार नगर गोरक्षण रोड अकोला, सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा वंसत देसाई स्टेडीयम समोर स्टेशन रोड अकोला, सुधाकरराव नाईक महाविद्यालय तुकाराम चौक अकोला, डवले ज्युनिअर कॉलेज चाचोडी रोड मोठी उमरी अकोला, महाराष्ट्र माध्यमिक शाळा केडीया प्लॉट जठारपेठ रोड अकोला, बी. आर. हायस्कूल ताजनापेठ मुख्य डाक घरामागे अकोला या केंद्रावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग दुय्यम सेवा संयुक्त पुर्व परिक्षा होणार आहे.
परिक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक उपाययोजना
परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करता येणार नाही, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाही. परिक्षा केंद्रावर प्रवेश करणाऱ्या सर्व परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे थर्मल, इफ्रारेड थर्मामिटरद्वारे तापमान तपासण्यात येईल. सर्व पर्यवेक्षकांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करणे अनिवार्य राहिल. हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने परिक्षा केंद्रावरील सर्व खिडक्या तसेच दरवाजे उघड्या ठेवाव्या. सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच परिक्षार्थी यांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. परिक्षार्थी यांना ओळखपत्र असल्याशिवाय व मास्क लावल्याशिवाय प्रवेश दिल्या जाणार नाही. प्रत्येक परिक्षार्थी मध्ये किमान तीन फुटाचे अंतर राहील. परिक्षा केंद्राचे प्रवेशद्वारासमोर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येईल. परिक्षा केंद्राच्या परिसराची सोडियम हायपोक्लोराईटच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करण्यात यावे. कोणत्याही परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचारी यांना कोव्हिड-19 ची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ नजीकच्या रुग्णालयात भरती करावे. परिक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेत बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यात येणार नाहीत. परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर एसटीडी बुथ, ध्वनीक्षेपक इत्यादी माध्यम परिक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येईल.
परिक्षा केंद्राचे परिसरात इंटरनेट, मोबाईल, फोन, सेल्युलर, प्लॅन ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यात मनाई राहील. परिक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्ती, वाहनास प्रवेशास मनाई राहील. वरील प्रतिबंधात्मक आदेश परिक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परिक्षार्थी तसेच परिक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांचे बाबत परिक्षा संबंधीत कर्तव्य पार पाडण्याचे दृष्टीने लागू राहणार नाहीत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे