अकोला:दि.31- जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थाना येणाऱ्या अडचणी, समस्या, तक्रारी या विषयावर चर्चा करण्याकरीता शुक्रवार दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बैठकीत सेवा सहकारी संस्थाचे काही अडचणी, समस्या व तक्रारी एका पानावर लिखीत स्वरुपात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांच्याकडे गुरुवार दि. 2 सप्टेंबर पर्यत सादर कराव्यात. बैठकीत कोव्हीड- 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासह मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टसिंग बाबींचे पालन करणे आवश्यक राहिल. बैठकीला प्रत्येक सेवा सहकारी संस्थाच्या अध्यक्ष व सचिव यांचे पैकी एक व्यक्ती अश्या फक्त 10 व्यक्तींना बैठकीत प्रवेश दिला जाणार आहे.
या अटीची नोंद घेऊन जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत सेवा सहकारी संस्थाचे अध्यक्ष व सचिव यांनी शुक्रवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन येथे हजर राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.