अकोला: जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, विधवा पत्नी यांना केंद्रशासनाची स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनासह राज्यशासनाचे पाचशे रुपये निवृत्तीवेतन दिला जातो. अशा स्वतंत्र्य सैनिक, विधवा पत्नी, वारसदार यांना स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनाची थकबाकी रक्कम 2004 पासून तत्कालिक दरानुसार देणेबाबत शासनाने निर्देशीत केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ज्या स्वातंत्र्य सैनिकानी केंद्रशासनाची स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतनधारकांनी याआधी राज्य शासन स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतन थकबाकी रक्कमेचा लाभ घेतला नाही, अशा स्वातंत्र्य सैनिक, विधवा पत्नी, वारसदार यांनी स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र, स्वातंत्र्य सैनिक सन्मानपत्र, मूत्यृप्रमाणपत्र, न्यायालयीन वारस प्रमाणपत्र, पी.पी.ओ प्रत, आधार कार्ड या आवश्यक कागदपत्रासह नाझर शाखा(स्वातंत्र्य सैनिक क