• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home फिचर्ड

पंढरपूरचे नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणी मोस्ट वॉन्टेड दोघांना अटक

Our Media by Our Media
August 28, 2021
in फिचर्ड
Reading Time: 1 min read
148 2
0
नगरसेवक-संदीप-पवार-
22
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

पंढरपूर : पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणाने सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या खून प्रकरणातील आरोपींना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यानुसार या प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड दोन फरार संशयित आरोपींना पंढरपूर पोलिसांनी कर्नाटकमधील म्हैसूर येथून अटक केली आहे. या खून प्रकरणातील सरजी टोळीशी संबंधित असलेल्या सुनील वाघ व सचिन देवमारे या संशयित आरोपीना म्हैसूर येथून पंढरपूर येथे आणण्यात आले आहे.

माजी नगराध्यक्षा सुरेखा दिलीप पवार यांचा मुलगा नगरसेवक संदीप पवार हे 18 मार्च 2018 रोजी येथील स्टेशन रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले होते.

हेही वाचा

ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोग मुक्त अभियान राबवा- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

हॉटेलमध्ये ते बसलेले असताना अचानक अज्ञात लोकांनी कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण खून केला होता.

या घटनेने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. सरजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुंडांच्या टोळीने हा खून केला असल्याचा पोलिसांना संशय आहे.

खून प्रकरणातील एकूण २७ आरोपींपैकी २४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

या आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

या खून प्रकरणातील उर्वरित 3 पैकी सुनील वाघ, सचिन देवमारे आणि अन्य एक असे तीन संशयित आरोपी फरार होते.

यापैकी मोस्ट वॉन्टेड सुनील वाघ आणि सचिन देवमारे हे कोल्हापूर, बेळगाव येथे काही दिवस राहिले. गेल्या काही दिवसांपासून ते दोघे कर्नाटकमधील म्हैसूर येथे नाव बदलून राहात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

सोलापूर पोलिसांच्या प्रयत्नाला यश

जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शोध घेतला जात होता.

पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र मगदूम यांनी म्हैसूर येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला.

मगदूम यांच्या पथकातील शरद कदम, सूरज हेंबाडे, राजेश गोसावी, सुनील बनसोडे, सुजित जाधव, विनोद पाटील यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेत सुनील वाघ आणि सचिन देवमारे या मोस्ट वॉन्टेड दोघा आरोपींना म्हैसूर येथे अटक करून पंढरपूरला आणले आहे.

आज या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आता या प्रकरणातील आणखी एक आरोपी अटक करावयाचा असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Tags: nagarsevaksandip pawarsolapursolapur police
Previous Post

पुणे हादरले..प्रेयसी विवाहित प्रियकराला सातत्याने ‘ तसला ‘ आग्रह करायची मात्र..

Next Post

Happy Janmashtmi 2021; जन्माष्टमीच्या मराठी शुभेच्छा मॅसेज देऊन साजरी करा यंदाची जन्माष्टमी

RelatedPosts

कोविड-१९ उपाययोजना आढावा बैठक : १५ ते १७ वयोगटातील लसीकरणाचा वेग वाढवा-जिल्हाधिकारी निमा अरोरा
Featured

ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोग मुक्त अभियान राबवा- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच निर्देश

June 13, 2023
जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन
Featured

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

April 14, 2023
आनंदाचा शिधा वितरण
Featured

आनंदाचा शिधा संच वितरण मुख्यमंत्र्यांनी साधला अकोल्यातील लाभार्थ्यांशी संवाद

April 14, 2023
शांतता समिती बैठक
Featured

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव: नागरिकांना सर्व सुविधांची सुसज्जता उपलब्ध करा- शांतता समिती बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

April 14, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत
Featured

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत

April 13, 2023
जवाहर नवोदय विद्यालय
Featured

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी शनिवारी (दि.29) निवड चाचणी परीक्षा: जिल्ह्यातील 22 केंद्रावर 5295 विद्यार्थी देणार परीक्षा

April 13, 2023
Next Post
Happy Janmashtmi 2021

Happy Janmashtmi 2021; जन्माष्टमीच्या मराठी शुभेच्छा मॅसेज देऊन साजरी करा यंदाची जन्माष्टमी

भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्‍ये घडवला इतिहास

भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्‍ये घडवला इतिहास

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.