अकोला,दि.28– जिल्ह्यातील खेळाडु असाधारण परिस्थितीमध्ये असुनही अधिकृत खेळाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धत प्राविण्य अथवा सहभाग संपादन केले आहे. तथापी आपल्या असाधारण परिस्थितीमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास बाधा निर्माण झालेली आहे अशा खेळाडुंची माहिती दि. 6 सप्टेंबर पर्यंत जिल्हा क्रिडा कार्यालय येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यानी केले आहे.
आवश्यक कागदपत्र :
एकविध जिल्हा खेळ संघटनाचे राज्य संघटनाशी सलग्न असल्याबाबत अद्यावत सलग्नता प्रमाणपञ (राज्य संघटना ही महाराष्ट ऑलिपिक एसोसिएशनशी सलग्न असणे अनिवार्य आहे), सन 2017 ते 2020 या वर्षात आपल्या संघटनेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेची माहिती(अधिकृत राष्ट्रीय अजिंक्य पद स्पर्धेचे नाव, ठिकाण व कालावधी), सन 2017 ते 2020 या वर्षात आपल्या संघटनेमार्फत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धत प्राविण्य अथवा सहभाग संपादन केलेल्या खेळाडुची यादी (खेळाडुचे संपुर्ण नांव, खेळाचे नांव, स्पर्धा कालावधी, पञव्यवहाराचा पता, मोबाईल क्रमांक) खेळाडुचे प्रमाणपत्राची छायाप्रतीसह यादीसह जिल्हयातील एकविध जिल्हा खेळ संघटनांनी आवश्क कागदपत्रे जिल्हा क्रीडा कार्यालय येथे सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यानी कळविले आहे.