अकोला (प्रतिनिधी)- शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौरक्षण रोडवरील आदर्श कॉलनी परिसरात एका घरात सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्डय़ावर खदान पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणावरून दोन महिलांसह दोन दलानांना ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार शहरातील गौरक्षण रोड परिसरातील आदर्श कॉलनीस्थित एका घरात देहव्यापारचा अड्डा सुरू असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पंटर पाठविला असता घरात देहव्यापार सुरू असल्याने दोन महिलांसह दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीची चौकशी सुरू असून रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.