अकोला : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना शिवर येथे घडली. ज्योती मांडोकार असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर नितेश उर्फ भारत सुखदेव खरात वय ३९ असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
मृतक ज्योती आणि नितेश यांच्यामध्ये वाद असल्याने नितेश हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यांच्यातील वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने नितेशने पत्नीला लाथाबुक्यांनी आणि नंतर काठीने मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती एमआयडीसीचे ठाणेदार किशोर वानखडे, डीबी स्कॉड पथकाचे पोहेकॉ. दयाराम राठोड, निलेश भोजने, संतोष डाबेराव यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी संशयावरून तिघांना ताब्यात घेतले होते. मात्र सखोल तपास केल्यानंतर पती नितेश हाच तिचा मारेकरी असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध भांदविचे कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.