अकोला (प्रतिनिधी)- वि.राष्ट्रीय हरित प्राधिकरण यांच्या निकषाचे उल्लंघन करणा-या दि. 27 ऑगस्ट रोजी मनपा आयुक्त नीमा अरोरा यांच्या आदेशान्वये मनपा क्षेत्रातील एकुण 6 होटेल, गार्डन व सभागृह वर सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये न्यु बस स्थानक जवळील होटेल राईजींग सन, रेलवे स्टेशन जवळील होटेल सिटी प्राईड, होटेल सुविधा, होटेल आर.एस., रामदास पेठ येथील डॉ.पार्थसारथी शुक्ल सभागृह, मुर्तीजापुर रोडवरील होटेल आर.जी., कृष्णा गार्डन यांचा समावेश आहे.
या कारवाईत बाजार/परवाना विभाग प्रमुख संजय खराटे, नगर रचना विभागाचे अभियंता राजेंद्र टापरे, अग्निशमन विभागाचे मनीष कथले, जलप्रदाय विभागाचे अभियंता अजिंक्य लांबे, अतिक्रमण विभागाचे चंद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा, दिनेश ठाकरे, गौरव श्रीवास, अतिक्रमण निर्मुलन सहायक सै.रफीक, रूपेश इंगळे, वैभव कवाडे, शोभा इंगळे अदिंचा समावेष होता.