• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 6, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home क्रीडा

नीरज चोप्रा म्हणाला, तुमच्या अजेंड्यासाठी माझा वापर करु नका!

Our Media by Our Media
August 26, 2021
in क्रीडा, फिचर्ड
Reading Time: 1 min read
160 1
0
Neeraj-Chopra
24
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

पानीपत : टोकियो ऑलिम्पिकमध्ये गाेल्‍डन बाॅय नीरज चोप्रा हा आक्षेपार्ह विधाने करणार्‍यांवर चांगलाच भडकला आहे. त्याने आपल्या सोशल अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करुन आपली बाजू मांडली. नीरज चोप्राने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ऑलिम्पिक फायनलमध्ये आपण आपला भाला शोधत होतो तो भाला पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याच्याकडे होता असे सांगितले होते. यावरुन अनेकांनी पराचा कावळा केला, असे नीरजने सुनावले आहे.

नीरज चोप्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडओ पोस्ट केला आहे. यामध्‍ये ताे म्हणतो की, पाकिस्तानच्या भालाफेकपटूने माझा भाला घेणे यात काहीच गैर नाही. हे नियमानुसारच घडले होते. याचा एवढा मोठा मुद्दा करण्याची गरज नव्हती.

हेही वाचा

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

नीरज चोप्रा पुढे म्हणाला, ‘मी सर्वांना विनंती करतो की, कृपा करुन माझा आणि माझ्या वक्तव्याचा तुमच्या विशिष्ट अजेंड्यासाठी आणि भ्रम पसरवण्यासाठी वापर करु नका. खेळ आम्हाला एकत्र येण्यास शिकवतो. माझ्या नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावर अनेकांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिली ते पाहून माझी निराशा झाली आहे.’

काय होते नीरजचे वक्तव्य?

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीच्या अंतिम फेरीत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करत नीरज चोप्राने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. त्यानंतर त्याचे देशभरातून कौतुक होऊ लागले. अनेक माध्यमांना त्याने मुलाखत दिली. नुकतीच त्‍याने एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली होती.

या मुलाखतीत त्याने सांगितले हाेते की, ‘ज्यावेळी अंतिम फेरी सुरु होणार होती त्यावेळी मी माझा भाला शोधत होतो. मला माझा भाला मिळत नव्हता. अचानक मला तो भाला पाकिस्‍तानचा खेळाडू अर्शद नदीम याच्या हातात दिसला. त्यानंतर मी त्याला बोललो की भावा मला हा भाला दे हा भाला माझा आहे. मला हा भाला टाकायचा आहे. त्याने मला माझा भाला परत दिला. तुम्हाला जाणवले असेल की मी माझा पहिला भालाफेक प्रयत्न करत असताना थोडा गडबडीत होतो.’

नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात आपली कामगिरी सुधारत ८७.५८ मीटर लांब भाला फेकला होता. या कामगिरीच्या जोरावरच नीरज चोप्रा सुवर्ण पदकाला गवसणी घालू शकला.

अनेकांना भालाफेकीत जर्मनीचा जोहान्स व्हेट्टर दमदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकेल, असा अंदाज होता.

Tags: Arshad NadeemNiraj chopraSportsTokiyo Olympic
Previous Post

बोलणं बंद करा, काय केलं ते सांगा! वाहन कंपन्यांचा मोदी सरकारवर संताप

Next Post

सख्ख्या बहिणीनेच भावाला दाखवले PORN व्हिडिओ आणि त्यानंतर..

RelatedPosts

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर
Featured

ब्रेकिंग न्यूज: भारताचा आव्हानवीर डी. गुकेश बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या शिखरावर

December 13, 2024
भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग
Featured

भारत-पाकिस्‍तान सामन्यावर पावसाचे ढग

June 8, 2024
जाहीर
Featured

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर.! सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात पहिली लढत

February 22, 2024
अकोला येथे 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा
Featured

अकोला येथे 10 मार्च रोजी ‘फिट अकोला’ मॅराथॉन स्पर्धा

February 22, 2024
जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
Featured

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

January 12, 2024
Featured

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

January 5, 2024
Next Post
सख्ख्या बहिणीनेच भावाला दाखवले PORN व्हिडिओ

सख्ख्या बहिणीनेच भावाला दाखवले PORN व्हिडिओ आणि त्यानंतर..

सोयाबीनवरील मरुका अळीचे व्यवस्थापन

सोयाबीनवरील मरुका अळीचे व्यवस्थापन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.